शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अनुवादातून विविध भाषांशी सुंदर रियाज : अपर्णा वेलणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 19:55 IST

सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या वतीने सुरू असलेल्या ५१व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.१४) प्रा. वृंदा भार्गवे यांनी वेलणकर यांची प्रकट सर्वस्पर्शी मुलाखत घेतली. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात वावरण्याची मिळालेली संधी, पत्रकारितेचा प्रवासापासून अनुवादक आणि संपादकापर्यंतच्या विविध टप्प्यांना स्पर्श करत सामाजिक प्रश्न व समस्यांवर विविध प्रश्नांची उत्तरे देताना वेलणकर यांनी धांडोळा घेतला.

ठळक मुद्देअनुवाद एका भाषेमधून दुस-या भाषेचा प्रवास अनुवाद करताना मूळ लेखकाचा मालकी हक्क विसरता कामा नये पुरुष विरुद्ध स्त्री असा लढा उभा राहता कामा नये

नाशिक : मूळ लेखक त्याची भाषा, अनुभव आणि अनुवादाची भाषा या चार गोष्टींची सांगड घालण्याचे काम अनुवादक करत असतो; मात्र हे करताना अनुवादकाने नेहमी अदृश्य राहून भाषेवर विशेष लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे ठरते. अनुवादातून विविध भाषांशी सुंदर रियाज करता येतो. अनुवाद करताना मूळ लेखकाचा मालकी हक्क विसरता कामा नये, असे मत ‘लोकमत’च्या फिचर एडिटर व सावानाच्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्ष अपर्णा वेलणकर यांनी मुलाखतीतून मांडले.सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या वतीने सुरू असलेल्या ५१व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.१४) प्रा. वृंदा भार्गवे यांनी वेलणकर यांची प्रकट सर्वस्पर्शी मुलाखत घेतली. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात वावरण्याची मिळालेली संधी, पत्रकारितेचा प्रवासापासून अनुवादक आणि संपादकापर्यंतच्या विविध टप्प्यांना स्पर्श करत सामाजिक प्रश्न व समस्यांवर विविध प्रश्नांची उत्तरे देताना वेलणकर यांनी धांडोळा घेतला. यावेळी वेलणकर यांनी पत्रकारितेचा प्रवासाचा आरंभ सांगताना ज्येष्ठ पत्रकार व गुरूवर्य दत्ता सराफ यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. अकरावीला असताना त्यांनी कोल्हापूरमध्ये एक लेख लिहिण्यास सांगितले आणि तेथून माझ्या जीवनाच्या प्रवासाला वेगळे वळण मिळाले, असे त्या म्हणाल्या. इंग्रजीमधील शोभा डे यांचे सिलेक्टिव मेमरी हे पुस्तक वाचत असताना त्याचे मराठीत अनुवाद करावेसे वाटले. त्यानंतर मी एके का पुस्तकाचे अनुवाद करत गेले. अनुवादक वाचकांना दिसता कामा नये. अनुवादाची भाषा जरी मराठी असली तरी लिखाण क रणा-या व्यक्तिमत्त्वानुसार ती घडवावी लागते. अनुवाद एका भाषेमधून दुस-या भाषेचा प्रवास असल्याचे वेलणकर यांनी यावेळी सांगितले.समाधान देणारे ललित लेखन कमी झाले‘दीपोत्सवा’बाबत भार्गवे यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या, कथा, कविता, कादंबरी या साहित्याचे मला अजिबात वावडे नाही; मात्र वाचकांचे समाधान करणारे दर्जेदार ललित लेखन कमी झाले आहे, अशी खंत वेलणकर यांनी यावेळी व्यक्त केली. काळानुरूप दिवाळी अंकाचे स्वरूप बदलणे स्वाभाविक होते. अन्य दीवाळी अंक आणि ‘दीपोत्सव’ यांची तुलना करणे त्या दिवाळी अंकांवर अन्यायकारक ठरणारी असेल. दिवाळी अंकाचे महत्त्व हे त्यांच्या ठिकाणी तसेच असल्याचेही वेलणकर यांनी यावेळी सांगिलते.

‘#मी टू’ विषयी चिंता वाटतेस्त्रियांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराविषयी धिटाईने समाजापुढे येऊन व्यक्त होण्याची ‘#मी टू’ नावाची चळवळ देशभरात सुरू झाली आहे. मनोरंजनाच्या दुनियेतील तारकेपासून या चळवलीला आरंभ झाला; मात्र या चळवळीविषयी मला चिंता वाटते, असेही वेलणकर यांनी ‘#मी टू’बाबतीत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. स्त्रियांचा हा लढा शोषण, छळाविरुद्ध असायला हवा; मात्र दुर्दैवाने पुरुषांविरोधी असल्याचे दिसून येते. या चळवळीच्या माध्यमातून वयात येणाऱ्या मुलींसमोर आपण समाजातील पुरुषांविषयीची कोणत्या प्रकारची प्रतिमा उभी करत आहोत? याचाही विचार होणे गरजेचे आहे. चळवळीच्या माध्यमातून अन्यायाला वाचा नक्कीच फुटली पाहिजे; मात्र पुरुष विरुद्ध स्त्री असा लढा उभा राहता कामा नये, असे त्यांनी यावेळी अधोरेखित केले

टॅग्स :Metoo CampaignमीटूNashikनाशिक