शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
5
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
6
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
7
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
8
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
9
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
10
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
11
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
12
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
13
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
14
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
15
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
16
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
17
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
18
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
19
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
20
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...

मंतरलेल्या रात्रीतील देखणा सोहळा

By admin | Updated: September 25, 2015 23:48 IST

मंतरलेल्या रात्रीतील देखणा सोहळा

त्र्यंबकेश्वर : सिंहस्थातील अखेरच्या पर्वणीनिमित्त निघणारी शाही मिरवणूक याचि देही याचि डोळा पाहता यावी, संत-माहात्म्यांचे दर्शन घेता यावे यासाठी देशभरातील लाखो भाविक गुरुवारपासूनच त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल झाले होते. शुक्रवारी सकाळी १० वाजता सर्व आखाड्यांचे शाहीस्नान पूर्ण झाले. शाहीस्रानादरम्यान रात्रीचे ते १२ तास मंतरलेल्या रात्रीसारखेच भासले. वेळ रात्री १० : त्र्यंबकेश्वर बसस्थानकापासून ते संपूर्ण गावाच्या परिसरात जिकडे-तिकडे बायामाणसांचे जथ्थेच्या जथ्थे... या गर्दीत कुणाची जेवणाची तयारी तर कुणाची रात्री झोपण्यासाठी जागा शोधण्याची लगबग.. कुणी मिळेल तिथे पथारी टाकलेली. अगदी गल्लीबोळातील घरांसमोरील मोकळ्या जागा आणि शासकीय कार्यालये, बॅँकांचे आवारही यातून सुटलेले नाही. काहींनी झोपण्याच्या जागेबरोबरच पहाटे सुरू होणारी मिरवणूक जवळून पाहता यावी म्हणून शाही मिरवणुकीच्या परतीच्या बॅरिकेडिंगमध्येच पथारी टाकलेली. यात महिला भाविकांची संख्या अधिक. रात्र जागविण्यासाठी कुणी गप्पांची मैफल रंगविली तर काही महिला घोळक्या घोळक्याने भजन, भक्तिगीते गाण्यात दंग. कोणी आखाडा परिसरात लावलेल्या मोठ्या पडद्यावर मालिका पाहण्यात गर्क.कुशावर्त परिसरातही काहीसे असेच चित्र. काही भाविक रात्रीच स्रान उरकून परतीच्या मार्गाला लागण्याच्या तयारीत असल्याने रात्रीच्या गारव्यातही अनेक महिला, पुरुष कुशावर्तात डुबकी मारत होते. रात्री ११ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्र्यंबकेश्वर येथे येण्यासाठी नाशिकहून निघाल्याचे कळल्यानंतर पोलीस प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत भाविकांचे स्रान सुरू ठेवत प्रशासनाने मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन केले. हळूहळू पोलिसांनी कुशावर्त परिसरातील गर्दी कमी करण्यास सुरुवात केली. रात्री ११.३० ते १२ दरम्यान भाविकांचे स्नान बंद झाले ते थेट दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत. ध्वनिक्षेपकावरून तशा सूचना सुरू झाल्या. हळूहळू कुशावर्त परिसर मोकळा झाला आणि तेथे उरले केवळ माध्यम प्रतिनिधी आणि पोलीस कर्मचारी.रात्री १२ : त्र्यंबक नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची कुशावर्ताची सफाई करण्याची लगबग. भाविकांनी पाण्यात टाकलेली फुले, कपडे काढत या कर्मचाऱ्यांनी कुशावर्ताची सफाई केली. रात्री १२.४५ ते १ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुशावर्त परिसरात आगमन झाल्यानंतर कुशावर्त तीर्थ पूजन करून कैलास मानसरोवरातून आणलेले पाणी कुशावर्त तीर्थात प्रवाहित करण्यात आले. पूजा आटोपल्यानंतर पाच मिनिटे मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी चर्चा करून प्रस्थान केले. आणि इकडे पोलीस प्रशासनाने शाहीस्रानाच्या तयारीला सुरुवात केली. रात्री २ : शाहीमार्गावर दुतर्फा भाविकांची आणि स्थानिकांची गर्दी वाढू लागली. मिळेल तिथे भाविकांनी जागा आरक्षित केल्या.रात्री ३ : शाही मिरवणूक मार्गाची साफसफाई, गावातील या मार्गावर स्थानिक महिला आणि विविध संस्थांच्या कार्यकर्त्यांची सडा रांगोळीची लगबग तर दुसरीकडे आखाड्यांमध्ये मिरवणुकीसाठी रथ सजविण्याची तयारी, अनेक आखाड्यांमध्ये मध्यरात्रीपासूनच ही तयारी सुरू होती. साधारणत: ३.३० च्या दरम्यान शाही मिरवणुकीला सुरुवात झाली. पहाटे ४ वाजेच्या सुमारास पहिला आखाडा शाहीस्नानासाठी कुशावर्त तीर्थात उतरला आणि अनेक साधू-महंतांनी श्रद्धेची डुबकी घेतली. यानंतर एकापाठोपाठ आखाडे आपापल्या क्रमाने कुशावर्त तीर्थावर आले. सकाळी १० वाजता शेवटच्या आखाड्याचे शाहीस्रान झाले अन् प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. (प्रतिनिधी)