शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अस्वली रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 19:05 IST

इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य ते अस्वली स्टेशन या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे त्याची दुरवस्था झाली आहे. हा नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्याला मोठेमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य ते अस्वली स्टेशन या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे त्याची दुरवस्था झाली आहे. हा नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्याला मोठेमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.या रस्त्यावरून धावणारी वाहने नादुरु स्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.दोन वर्षापुर्वी घोटी परिसरातील देवळे येथील वाहतूक मार्गावरीलपूल पावसामुळे बंद पडला होता. यामुळे या पुलावरील वाहतूक मुंढेगाव मार्गे अस्वली तसेच नांदुरवैद्य या रस्त्याने वळविण्यात आली आहे. यारस्त्यावर रहदारी वाढली आहे. परिणामी ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने या रस्त्याची चाळण झाली आहे.नांदूरवैद्य ते अस्वली या रस्त्याची काही प्रमाणात डागडुजी झाली.परंतू या रस्त्याचे कित्येक वर्षांपासून आजपर्यंत पुर्ण डांबरीकरण झालेले नाही. हा रस्ता पुर्ण का होत नाही ? तसेच कामाला सुरु वात झाल्यानंतर दोन दिवसात तात्पुरते डागडुजीकरण करून सदर रस्त्याचे काम बंद का केले जाते ? असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.रस्त्याकडे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधीनी याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे यावेळी नागरिकांनीसांगितले.या रस्त्याने गोंदे औद्योगिक वसाहतीत अनेक कामगार राञी अपराञी नोकरीस जात असतात.तसेच या रस्त्याने हिंस्ञ श्वापदांचा नेहमीच वावर असतो. या रस्त्याला वीजेची सोय नाही. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी त्वरीत सदर रस्त्याच्या निकृष्ट झालेल्या कामाची चौकशी करून नवीन कामास सुरूवात करावी अशी मागणी नांदूरवैद्यचे ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकroad transportरस्ते वाहतूक