शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
2
Video : पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
3
BSE Bomb Threat: "बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल!
4
संतापजनक! ६ मुलं तरी मुखाग्नीसाठी ६ तास थांबले, अंत्यसंस्कारावेळी संपत्तीवरुन स्मशानभूमीत भिडले
5
हत्या की अपघात? रस्त्यावर स्कूटी, शेतात चप्पल... बेपत्ता बँक मॅनेजरचा विहिरीत सापडला मृतदेह
6
जम्मू-काश्मीरमधील दोडामध्ये भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेले वाहन दरीत कोसळले; सात जणांचा मृत्यू
7
Bread Gulabjam: उरलेल्या ब्रेडच्या स्लाईजपासून १० मिनिटात करा मऊ रसरशीत गुलाबजाम! 
8
"मी एक मोठा सिनेमा करतोय...भाऊ कदम अन् 'हा' अभिनेता दिसणार"; निलेश साबळेचा खुलासा
9
टाटाचा 'हा' स्टॉक ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर! गुंतवणूकदार मालामाल, तुम्ही खरेदी केलाय का?
10
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
11
कुतुहलापोटी रेल्वे इंजिन बघायला वर चढला, पण हाय पॉवर केबलचा करंट जीवावर बेतला; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
12
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
13
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!
14
"तो लहान मुलगा म्हणाला मी उंदीर खाल्ला...", 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्रीने सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव
15
DMR Stock Price: ५ वर ८ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरची किंमत २०० रुपयांपेक्षाही कमी, स्टॉकमध्ये १४ टक्क्यांपेक्षाही अधिक तेजी
16
टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
17
सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?
18
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
19
वाहन उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; एकाचवेळी दोन दिग्गज कंपन्या भारतात एन्ट्री करणार
20
निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी आणखी एक आशेचा किरण! येमेनच्या बंद खोलीत चर्चा सुरू

आरोग्य केंद्रे तपासण्याचा अधिकार बीडीओंकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 01:06 IST

प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रावर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी गैरहजर राहत असल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात तालुका वैद्यकीय अधिकारी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांना आरोग्य केंद्रांची तपासणी तसेच चौकशी करण्याचे अधिकार देण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी करण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेत ठराव : वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी गैरहजर

नाशिक : प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रावर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी गैरहजर राहत असल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात तालुका वैद्यकीय अधिकारी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांना आरोग्य केंद्रांची तपासणी तसेच चौकशी करण्याचे अधिकार देण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आयत्या वेळच्या विषयांवर चर्चा सुरू असताना इगतपुरी तालुक्यातील खेडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्या दोन दिवसांपासून बंद असून, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हजर नाहीत. केंद्र का बंद आहे याचा खुलासाही करण्यास कोणी नाही, उलट दोन दिवसांपूर्वी वेळेवर उपचार न मिळाल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची तक्रार सदस्यांनी केली. त्यावर तालुका वैद्यकीय अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची मिलीभगत असून, अधिकारी गैरहजर असल्यास ते एकमेकांना सांभाळून घेतात व रुग्णसेवा वाºयावर सोडत असल्याची तक्रार सभापती अश्विनी आहेर यांनी केली. यापूर्वी तालुका वैद्यकीय अधिकाºयाच्या रजा मंजुरीचे अधिकार गट विकास अधिकाºयांकडे होते ते नंतर काढून घेण्यात आले त्यामुळे कोणाचेच कोणावर नियंत्रण नसल्याचे सांगण्यात आले. अनेक आरोग्य केंद्राच्या मुख्यालयी आरोग्य कर्मचारी राहत नसल्याची तक्रारी करण्यात आल्या. यावर जिल्हा आरोग्य अधिकारी विजय डेकाटे यांनी झाल्या प्रकाराची आपण स्वत: चौकशी करणार असल्याचे सांगितले, तर उदय जाधव यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लावण्यात आलेल्या बायोमेट्रिक यंत्राच्या चौकशीचे काय झाले? असा सवाल केला. यावर आरोग्य केंद्रे व उपकेंद्रावर कार्यरत वैद्यकीय अधिकाºयांच्या रजेचे अधिकारी तालुका वैद्यकीय अधिकारी व गट विकास अधिकाºयांना संयुक्तरीत्या देण्यात यावेत जेणे करून एकमेकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असून, आरोग्य केंद्रांची तपासणी वा चौकशी करण्याचे अधिकार गट विकास अधिकाºयांना देण्याचा ठराव मांडण्यात आला.जिल्ह्णातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे वीज बिल मोठ्या प्रमाणावर थकले असून, बिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. मध्यंतरी ग्रामपंचायतींनी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून शाळांचे वीज बिल भरण्याचे आदेश ग्रामपंचायतींना देण्यात आले होते. परंतु त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. जिल्ह्णातील ३,२८५ शाळांपैकी ६७८ शाळांमध्ये अद्याप पर्यंत वीज पोहोचलेली नाही, तर ६१ शाळा दुर्गंम ठिकाणी असल्याने तेथे वीजपुरवठा होऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले. एकीकडे शाळांमध्ये वीज नसताना दुसरीकडे ग्रामपंचायतींकडून शाळांसाठी लाखो रुपयांचे साहित्य पाठविले जात आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद