शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आमदारत्रयीत श्रेयवादाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 19:09 IST

येवला विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्याक क्षेत्रातील मूलभूत सुविधांसाठी निधी मंजुरीवरून आता आमदार छगन भुजबळ, आमदार नरेंद्र दराडे आणि शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली असून, तीनही आमदारांच्या समर्थकांनी आपल्या नेत्यामुळेच प्रयत्नांना यश येऊन तालुक्याला भरघोस निधी मिळाल्याची पत्रके प्रसिद्धीस देत दावेदारी ठोकली आहे.

ठळक मुद्देनिधी मंजूर : अल्पसंख्याक क्षेत्रासाठी ६९ लाखांचा निधी

येवला : येवला विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्याक क्षेत्रातील मूलभूत सुविधांसाठी निधी मंजुरीवरून आता आमदार छगन भुजबळ, आमदार नरेंद्र दराडे आणि शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली असून, तीनही आमदारांच्या समर्थकांनी आपल्या नेत्यामुळेच प्रयत्नांना यश येऊन तालुक्याला भरघोस निधी मिळाल्याची पत्रके प्रसिद्धीस देत दावेदारी ठोकली आहे.येवला विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्याक क्षेत्रातील मूलभूत सुविधांसाठी ६९ लाख रुपयांची ९ कामे मंजूर झाली असल्याची माहिती एका पत्रकान्वये भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयाने दिली आहे. ग्रामीण भागातील अल्पसंख्याकबहुल क्षेत्रात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी छगन भुजबळ यांच्या प्रयत्नामुळे ही कामे झाल्याचा दावा यात करण्यात आला आहे, तर नाशिक जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीपैकी त्यातील ४९ लाख रु पयांचा निधी येवला तालुक्यासाठी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार नरेंद्र दराडे आणि आमदार किशोर दराडे या दोघा आमदार बंधूंच्या वतीने कुणाल दराडे यांनी प्रसिद्धिस दिली आहे. आमदार दराडे बंधूंच्या प्रभावामुळेच येवल्याला सर्वाधिक निधी मिळाल्याचा दावाही कुणाल दराडे यांनी केला आहे. त्यात राजापूर गटात सर्वाधिक कामे मंजूर झाल्याचेही त्यांनी सांगितले.शासनाने राज्यातील अल्पसंख्याकबहुल ग्रामीण क्षेत्रातील मूलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्याक लोकसमूहातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचवण्यासाठी सन २०१८-१९ मध्ये ग्रामीण क्षेत्रविकास कार्यक्र मास मंजुरी दिली आहे. या निधी मंजुरीवरून आता भुजबळ आणि दराडे बंधू समर्थकांकडून दावेदारी केली जात असून, श्रेयवादाची लढाई यापुढे आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.विविध कामांचा समावेशसदर कामांमध्ये निफाड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील मुस्लीम वस्तीत रस्त्याचे काँक्रि टीकरण करणे (२० लाख) तसेच येवला तालुक्यातील पाटोदा येथे शादीखाना बांधणे (७ लाख), न्याहारखेडा येथे शादीखाना बांधणे (७ लाख), न्यारखेडा येथे कब्रस्तानास संरक्षक भिंत बांधणे (५ लाख), अनकाई येथील जैन धर्मस्थानक परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे (३ लाख), तळवाडे येथे शादीखाना बांधणे (७ लाख), कौटखेडा येथे शादीखाना बांधणे (७ लाख), राजापूर येथील कब्रस्तानाला संरक्षक भिंत बांधणे (१० लाख) आणि नगरसूल मशीदजवळ पेव्हर ब्लॉक बसवणे (३ लाख) या कामाचा समावेश आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणMONEYपैसा