शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या लढाईत पोलीस पाटलांचे कार्य कोरोना योद्धयां प्रमाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 18:25 IST

सिन्नर: जगात कोरोना ने थैमान घातल्यावर कोरोनावर मात करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांबरोबरच शिक्षक, सफाई कामगार, वैद्यकीय क्षेत्र पुढे सरसावले. कोरोना विरुद्धच्या या लढाईत पोलीस आणि जनता यांच्यातील दुवा असलेल्या पोलीस पाटलांनी निभावलेली भूमिका प्रशंसनीय आहे.

ठळक मुद्देमाधव पडिले: वावी पोलिसांकडून कोरोना योद्धाचा सत्कार

सिन्नर: जगात कोरोना ने थैमान घातल्यावर कोरोनावर मात करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांबरोबरच शिक्षक, सफाई कामगार, वैद्यकीय क्षेत्र पुढे सरसावले. कोरोना विरुद्धच्या या लढाईत पोलीस आणि जनता यांच्यातील दुवा असलेल्या पोलीस पाटलांनी निभावलेली भूमिका प्रशंसनीय आहे. जनमानसात दिवसेंदिवस कोरोनाची भीती कमी होत असताना बाधित यांची संख्या वाढत आहे. पुढील काळात कोरोना सोबत जगतांना पोलीस पाटलांना अधिक सतर्क राहावे लागेल असे निफाडचे विभागीय पोलीस उपअधीक्षक माधव पडिले यांनी वावी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावच्या पोलीस पाटलांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करतांना सांगितले.याप्रसंगी व्यासपीठावर प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक गोडबोले, सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे, वावीचे सपोनि रणजीत गलांडे, उपनिरीक्षक अभय ढाकणे, नाशिक जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष मुकेश कापडी, उपाध्यक्ष संदीप कुटे, सामाजिक कार्यकर्ते अजित सेंदर, संजय शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे यांनी कोरोना योद्धा म्हणून या काळात महत्वाची भूमिका पार पाडली ते अभिनंदनास पात्र आहे असे पडिले म्हणाले.वावी पोलीस स्टेशनच्या मैदानात आयोजित या सत्कार समारंभात पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या पोलीस पाटलांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पडिले यांनी प्रत्येक पोलिस पाटलांशी वैयक्तिक संवाद साधत स्थानिक परिस्थिती जाणून घेतली. पोलीस खात्यास योग्य वेळी असेच सहकार्य करण्याचे आवाहन केले. अजित सेंदर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य