शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीच्या पुराचा जायकवाडीला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 01:20 IST

पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यांत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेने गोदावरी व दारणा नदीला आलेल्या पुरामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाला मोठा आधार मिळाला असून, एकट्या नाशिक जिल्ह्यातून गेल्या आठ दिवसांत किमान नऊ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात पोहचले आहे.

नाशिक : पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यांत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेने गोदावरी व दारणा नदीला आलेल्या पुरामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाला मोठा आधार मिळाला असून, एकट्या नाशिक जिल्ह्यातून गेल्या आठ दिवसांत किमान नऊ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात पोहचले आहे.  नगर व मराठवाड्यांतील जिल्ह्यांची तहान भागविण्याची जबाबदारी असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या पाण्यावर नेहमीच त्यांचा डोळा असतो. दरवर्षी पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात किती पाऊस पडला व धरणे किती भरली यावर त्यांचे लक्ष असते. विशेषकरून गंगापूर व दारणा धरणातून दरवर्षी नगर व मराठवाड्यांसाठी पाणी सोडले जाते. जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरून तीन वर्षांपूर्वी मोठे रणकंदन माजले होते. राज्य सरकारने नाशिकवर दबाव टाकून १२ टीएमसी पाणी गंगापूर धरणातून पळविल्याने या विषयावरून राजकारणही रंगले होते. नाशिकमध्ये सर्वपक्षीय आंदोलन छेडण्यात येऊन भाजपाला आरोपीच्या पिंजºयात उभे करण्यात आले, तर प्रकरण थेट उच्च न्यायालयात पोहोचल्याने बरीच चर्चा झडली. मुळा धरणातूनही सोडले पाणीगेल्या वर्षी जिल्ह्यात १३० टक्के पाऊस झाल्याने जुलै महिन्यातच गंगापूर धरणात ८० टक्के जलसाठा झाला होता. त्यामुळे गोदावरीला दोनवेळा आलेल्या पुरामुळे जायकवाडीत पुरेसे पाणी पोहोचले होते. यंदाही गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाच्या संततधारेमुळे गोदावरी व दारणा धरणांत ७९ टक्के जलसाठा झाला. दोन्ही धरणांच्या क्षेत्रात पाऊस कायम असल्यामुळे धरणाची सुरक्षितता लक्षात घेता गेल्या सोमवारपासून गंगापूर व दारणा धरणांतून पाणी सोडले जात आहे.दारणा व गोदावरीचे पाणी नांदुरमधमेश्वर बंधाºयात पोहोचून तेथून ते पुढे नगरमार्गे जायकवाडीत जात आहे. नगर जिल्ह्यातील मुळा धरणातूनही पाणी सोडण्यात आल्याने गेल्या आठ दिवसांत जायकवाडी धरणात किमान नऊ टीएमसी पाणी पोहोचल्याचा दावा अधिकाºयांनी केला आहे. सध्या जायकवाडीत २८ टक्के साठा झाला आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणgodavariगोदावरी