शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी नदीने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 20:10 IST

चांदोरी : राज्यावर दुष्काळाचे सावट दिसत असताना गोदावरी नदीने तळ गाठला आहे. बारमाही असलेली व अहमदनगर, मराठवाडा व नाशिकची जीवनदायीनी असलेल्या गोदावरीने तळ गाठला.

ठळक मुद्देचांदोरी : ग्रामस्थांची पाणी आवर्तन सोडण्याची मागणी

चांदोरी : राज्यावर दुष्काळाचे सावट दिसत असताना गोदावरी नदीने तळ गाठला आहे. बारमाही असलेली व अहमदनगर, मराठवाडा व नाशिकची जीवनदायीनी असलेल्या गोदावरीने तळ गाठला.कमी झालेल्या पर्जन्यमान यामुळे पाणी टंचाईच्या झळा आता गोदाकाठी असलेल्या गावांना बसत आहे. चांदोरी पासून पूढे ८ ते १० किमी अंतरावर असलेल्या नांदूरमध्यमेश्वर धरणाचा फुगवटा चांदोरी येथील गोदापात्रात असतो परंतु धरणाच्या पाण्याची पातळी कमी असल्याने पाणी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.एप्रिल महिन्याच्या सुरवाती पासूनच गोदावरी नदीची पाणी पातळी घटण्यास सुरवात झाली होती. एप्रिलच्या अखेर गोदावरीने तळ गाठला. यामुळे गोदाकाठच्या गावांना तसेच आसपासच्या गावांना दुष्काळाची झळ सोसावी लागत आहे. चांदोरी व इतर गावातील शेतकऱ्यांनी लाखो रु पये खर्चकरून शेतीसाठी नदीवरु न पाईपलाइन केली आहे. नदीपात्रात मूळ पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या सिंचनाचा व जनावरांच्या चाºयाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.चांदोरी येथे गोदावरी नदीवर घाट असल्याने दशक्रि या विधीचे कार्यक्र म येथे होत असतात परंतु पाण्याचा अभावामुळे अंघोळी करीता ग्रामपालिकेच्या टँकर मार्फत पाणी पुरवठा होत आहे. चांदोरीच्या पश्चिम व उत्तर भागात शेत, मळ्यातील विहिरींनी व बोअरवेलने सुद्धा तळ गाठला आहे. या मुळे शेतकऱ्यांची शेतीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.सद्यस्थितीला नदी पात्रात असलेल्या ग्रामपालिकेच्या विहिरी मधून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा केला जात आहे. हा पुरवठा अवघे काही दिवस टिकेल इतका आहे. यामुळे आता स्थानिक नागरिक व शेतकरी धरणाच्या पाण्याचा आवर्तनाची मागणी करू लागले आहे.राज्यभर दुष्काळस्थिती असताना गोदावरी नदीने तळ गाठल्याने गोदाकाठ व इतर परिसरातील गावांनी पाणीटंचाई लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापरावे.- शिरीष गडाख,उपसरपंच, ग्रामपालिका चांदोरी.