शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

भोजापूर धरणाने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 14:30 IST

नांदूरशिंगोटे - सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या म्हाळुंगी नदीवरील भोजापूर धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. परिसरासाठी वरदान ठरलेल्या भोजापूर धरणात केवळ एक टक्का पाणीसाठा शिल्लक राहिला असून मृत पाणी साठ्यावर पाणी पुरवठा योजनांचे भवितव्य अवलंबून आहेत.

नांदूरशिंगोटे - सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या म्हाळुंगी नदीवरील भोजापूर धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. परिसरासाठी वरदान ठरलेल्या भोजापूर धरणात केवळ एक टक्का पाणीसाठा शिल्लक राहिला असून मृत पाणी साठ्यावर पाणी पुरवठा योजनांचे भवितव्य अवलंबून आहेत. पाच धरणांपैकी भोजापूर धरण सर्वात मोठे धरण आहे. सिन्नर व संगमनेर तालुक्यातील काही गावे धरणाच्या लाभक्षेत्रात असून भोजापूर धरणावरच परिसरातील पाणी पुरवठा योजना व शेती व्यवसाय अवलंबून आहे. म्हाळुंगी नदीवर भोजापूर धरण बांधण्यात आले असून ३६१ दशलक्ष घनफूट क्षमता असुन १०७ दशलक्ष घनफूट निरूपयोगी साठा आहे. गत महिन्यापासून तीव्र उन्हामुळे धरणातील पिण्याचे वेगाने बाष्पीभवन तसेच धरणातून राजरोसपणे होणारा अवैध पाणी उपसा यामुळे धरणातील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत आहे.यावर्षी भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरून सुध्दा मागील वर्षी पेक्षा पाणीसाठा कमी शिल्लक राहिल्याने मे मिहन्याच्या अखेरीस धरण कोरडे पडण्याची शक्यता आहे.भोजापूर धरण गतवर्षी पुर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत होते. पूरपाण्याचा लाभक्षेत्रातील गावांना फायदा झाला होता. सिन्नर व संगमनेर तालुक्यातील सुमारे २१ गावातील १०० च्या आसपास लहान मोठे केटीवेअर बंधारे भरण्यात आले होते. तब्बल अडीच मिहने पूरपाणी कालव्याद्वारे सुरु होते. पुर्व भागातील पांगरी परिसरात आमदार राजाभाऊ वाजे यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे अनेक वर्षानतंर पाणी पोहचले होते. भोजापूर धरणाच्या पाण्यावर कणकोरी सह पाचगावे व मनेगाव सह सोळागावे नळपाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. आजमतिीला धरणातील उपयुक्त पाण्यासाठ्या पैकी फक्त दोन दशलक्ष घनफूट पाणी साठा शिल्लक आहेत. धरणातील मृत पाणी साठ्यावर आगामी काळात पाणी पुरवठा योजना तग धरून राहतील अशी परिस्थिती आहे. धरणातील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने पाण्याला पिवळसर रंग येतो. त्यामुळे पाणी बेचव लागते.भविष्य काळात पाणी टंचाई लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे.पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, भोजापूर धरणात उपयुक्त पाणी साठा संपत आला असुन मृतपाणी साठ्यावर नळपाणी योजना सुरू राहतील व सुमारे दोन महिने पाणी पुरवठा सुरू राहू शकतो.------------------गाळाची समस्या बनली गंभीरभोजापूर धरणाच्या पाण्यावरच परिसराचे भवितव्य अवलंबून आहे.भोजापूर धरण उभारणीपासून आजपर्यंत गाळ उपसण्यात आला नाही तसेच धरणाच्या अनेक भागात टेकड्या असल्याने पाण्याची जागा गाळाने व्यापली आहे. त्याचा परिणाम पाणी पातळीवर झाला आहे.गाळाचे प्रमाण जास्त असल्याने पावसाळ्यात धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर धरणातील पाणी नदी द्वारे वाहून जाते.धरणातील गाळ काढल्यास पाण्याची पातळी वाढेल आण ित्याचा फायदा लाभक्षेत्रातील शेतकर्यांना होईल. 

टॅग्स :Nashikनाशिक