शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

राष्टÑीयीकृत बॅँकांकडून होते अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:54 IST

आमच्या बँकेतच खाते का उघडता, असा प्रश्न देवळालीच्या राष्ट्रीय बँकेत बचत खाते उघडणाऱ्या ग्राहकांना विचारला जातो, तर नानेगाव येथे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडताना लागणाºया अर्जासाठी चक्क सत्तर रुपये आकारण्याचा प्रकार घडत आहे. याबाबत तक्रार करून काहीच कारवाई होत नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

देवळाली कॅम्प : आमच्या बँकेतच खाते का उघडता, असा प्रश्न देवळालीच्या राष्ट्रीय बँकेत बचत खाते उघडणाऱ्या ग्राहकांना विचारला जातो, तर नानेगाव येथे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडताना लागणाºया अर्जासाठी चक्क सत्तर रुपये आकारण्याचा प्रकार घडत आहे. याबाबत तक्रार करून काहीच कारवाई होत नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.शुक्रवारी देवळाली कॅम्पमध्ये एक वयोवृद्ध महिला बचत खाते उघडण्यासाठी आल्या असता तेथील महिला कर्मचाºयाने आजीलाच उलट प्रश्न करत आमच्या बँकेतच खाते कशाला उघडता, असा प्रश्न खडसावत बँकेतून आजीला निघून जाण्यास सांगितले. यावेळी उपस्थित एका लष्करी जवानाने त्या महिला कर्मचाºयाला ग्राहकांनी खाते उघडले नाही, तर कर्मचाऱ्यांना कामच राहणार नाही अशी जाणीव करून दिली. त्यावर कागदपत्रे अपूर्ण असल्याची सारवासारव त्या महिला कर्मचाºयाने केली.नानेगाव येथील राष्ट्रीयीकृत बँकेत लष्करी जवान आपल्या पत्नीसह बचत खाते उघडण्यास गेला असता संयुक्त खात्यासाठी आवश्यक असलेला अर्ज बाजूला मिळतो, असे सांगितले व जवानाकडून अर्जाची किंमत म्हणून सत्तर रुपयाची मागणी केली.सदर जवानाने याबाबत अर्ज बँकेत का मिळत नाही अशी विचारणा केली तर तेथेही आमच्या बँकेत का येतात? अशी विचारणा केली गेली. त्यावेळी जवानाने सदर बँक घराजवळ असल्याने आलो, तुम्ही शाखा बंद करा म्हणजे आम्ही बँकेत येणार नाही, असे उत्तर दिले. सदर जवानाने बँकेतून घरी गेल्यानंतर नानेगाव बँकेच्या शाखेत अर्जाकरिता सत्तर रुपये का लागतात याची तक्रार बँकेच्या टोल फ्री नंबरवर केली. या तक्रारीनंतर दुसºया दिवशी त्याच शाखेतून जवानाशी भ्रमणध्वनीने संपर्क साधून तक्रार मागे घेण्यासाठी बँकेत येण्याची सूचना करण्यात आली. मात्र जवान न गेल्याने त्याने तक्रार मागे घेण्यासाठी बँकेतून थेट त्या गावातील ‘बाहुबली’ नेत्यास साकडे घालण्यात आले.ग्राहकांवरच आक्षेपरात्री ८ वाजता जवान बँकेत गेला असता, ‘तुमच्यामुळे आम्हाला बँक सुरू ठेवावी लागली, तुम्ही तक्रार केलीच कशाला’ अशा शब्दात कर्मचाºयांनी जवानाला सुनावले. एकीकडे बॅँकांचा खातेदार वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र ग्राहक नको अशी भूमिका घेतली जात आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रconsumerग्राहक