शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘बॅरिकेड’ असून अडचण, नसून खोळंबा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:41 IST

नाशिक : जुन्या पंडित कॉलनीमधील एकेरी वाहतुकीचा नियम अंमलात आणण्याचा पोलिसांचा खटाटोप अपघातांना निमंत्रण देणाराच ठरत आहे. कारण या नियमांच्या अंमलबजावणीसाठी टिळकवाडी सिग्नलवर लावलेले बॅरिकेड हे वाहनचालकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देरोगापेक्षा आता इलाज भयंकर अंमलबजावणीपेक्षा फज्जा अधिक

नाशिक : जुन्या पंडित कॉलनीमधील एकेरी वाहतुकीचा नियम अंमलात आणण्याचा पोलिसांचा खटाटोप अपघातांना निमंत्रण देणाराच ठरत आहे. कारण या नियमांच्या अंमलबजावणीसाठी टिळकवाडी सिग्नलवर लावलेले बॅरिकेड हे वाहनचालकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे. तरण तलावाकडे जाणारे वाहनचालक या बॅरिकेडपुढे जाऊन वाहने उभी करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बॅरिकेड ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. टिळकवाडी सिग्नलवरून पुढे तरणतलाव सिग्नल अथवा कॅनडा कॉर्नर आणि सीबीएसच्या दिशेने मार्गक्रमण करण्यास शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून बंदी घालण्यात आली. हा उपाय जुन्या पंडित कॉलनीत निर्माण होणाºया वाहतूक कोंडीच्या समस्येवर पोलिसांनी शोधून काढला आहे. रस्त्यावर उभ्या राहणाºया चारचाकी वाहनांमुळे दुहेरी वाहतुकीसाठी हा रस्ता कमी पडत असताना पोलिसांनी अवैधरीत्या पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्याऐवजी एकेरी वाहतूक सुरू केली; मात्र एकूणच रोगापेक्षा आता इलाज भयंकर झाल्याच्या प्रतिक्रिया संतप्त नागरिकांकडून उमटत आहेत. सरकारवाडा पोलीस ठाण्याकडून येणारी वाहतूक शहर वाहतूक शाखेला अपेक्षित असल्याप्रमाणे सरळ मॅरेथॉन चौकापर्यंत न जाता जुन्या पंडित कॉलनीतून वळण घेत टिळकवाडी सिग्नलवरून पुढे मार्गस्थ होत आहे. यामुळे एकेरी वाहतूक नियमाच्या अंमलबजावणीपेक्षा फज्जा अधिक उडाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. जुन्या पंडित कॉलनीच्या वळणावर पोलिसांकडून बॅरिकेड लावण्यात आलेले नाही, त्यामुळे वाहने सर्रास वळण घेत सिग्नलपर्यंत येतात आणि येथे बॅरिकेड बघून पुन्हा माघारी न जाता बॅरिकेडच्या पुढे किंवा शेजारी उभे राहून सीबीएस-कॅनडाकॉर्नरचा सिग्नल लागताच अचानकपणे पुढे वाहने दामटवितात; मात्र यावेळी विरुद्ध बाजूच्या सुटणाºया सिग्नलमुळे वाहने समोरासमोर येऊन अपघाताची स्थिती उद्भवते.