शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘परीक्षा’ येता जवळी ; चेहरे लागले बोलू....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 00:32 IST

मालेगाव : पाच वर्षांचा अभ्यास करायचा म्हणजे मतदारांची ‘विकास’कामे करायची, त्यांच्या समस्या सोडवायच्या, कार्यकर्ते सांभाळायचे अन् पाच वर्षांनंतर निवडणूक लागली की, ‘परीक्षे’चा अर्ज भरायचा. परीक्षार्थी उमेदवारांबरोबरच त्यांच्या कार्यकर्त्यांनी निकालाची आधीच धास्ती घेतली असून, कार्यकर्त्यांचे चेहरे बोलू लागले आहेत.

ठळक मुद्दे निकालाच्या आधीच धास्ती : कार्यकर्त्यांच्या बळावरच उमेदवार अवलंबून

शफीक शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : पाच वर्षांचा अभ्यास करायचा म्हणजे मतदारांची ‘विकास’कामे करायची, त्यांच्या समस्या सोडवायच्या, कार्यकर्ते सांभाळायचे अन् पाच वर्षांनंतर निवडणूक लागली की, ‘परीक्षे’चा अर्ज भरायचा. परीक्षार्थी उमेदवारांबरोबरच त्यांच्या कार्यकर्त्यांनी निकालाची आधीच धास्ती घेतली असून, कार्यकर्त्यांचे चेहरे बोलू लागले आहेत.परीक्षा आता दोन दिवसांवर येऊन ठेपली असून, निकालही त्यानंतर तात्काळ दोनच दिवसात जाहीर होणार असल्याने दोन्ही मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे निवडणूक निकालाकडे लक्ष लागले आहे. आपल्याला जास्तीत जास्त ‘मार्क्स’ कसे मिळतील यासाठी उमेदवारांसह कार्यकर्ते दिवसाची ‘रात्र’ करीत असून, प्रचार सभांमधून अंधारात अभ्यासाच्या फैरी झडू लागल्या आहेत. बालगोपाळही मतदानाचा अधिकार नसताना खांद्यावर विविध रंगाचे झेंडे घेत बेरंग होत असून, वर्षभर अडगळीत पडणाºया तोफा आता गल्लीबोळांमधील व्यासपीठांवरून धडाडू लागल्या आहेत. काही तोफा कधी या गटात, तर कधी त्या गटात दिसत असल्याने त्यांना मिळणाºया दारूगोळ्याचीदेखील चर्चा गल्लोगल्ली रंगत आहेत.अभ्यास करून मिळविलेल्या ‘मार्कां’च्या बळावर की ‘कॉपी’बहाद्दर समर्थकांच्या बळावर दोन्ही मतदारसंघातील कोणते उमेदवार ‘पास’ होतात की ‘बोर्डात’ चमकतात याविषयी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.मालेगावच्या गल्लीबोळातील सर्वच राजकीय पक्षांचे समर्थक, कार्यकर्ते आणि हितचिंतक एक दुसºयाला कोणत्या बाजूची ‘हवा’ आहे याची विचारणा करीत असले तरी निवडणुकीच्या या वावटळात कुणाचा तंबू शाबूत राहतो आणि कुणाचा उडून जातो याकडे शहराचे लक्ष लागून आहे.परीक्षेत कॉपी होऊ नये म्हणून परीक्षकांनाही खास प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यांना परीक्षा काळात परीक्षार्थींच्या पेपरवर सुपरवायझरसारखे बारीक लक्ष ठेवावे लागणार आहे. फरक इतकाच की शाळेतील खरी परीक्षा तीन तासांची आणि निवडणुकीतील परीक्षा दिवसभरातली. आता परीक्षार्थी व्यासपीठावर नको ते प्रश्न उपस्थित करीत असून, त्यांची उत्तरे इतर सभांमधून ऐकू येत आहेत.बोलके चेहरे : मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य या दोनपरीक्षा केंद्रांवर होणाºया परीक्षेत उमेदवारांना प्रचाररूपी कॉपी पुरविणाºया कार्यकर्त्यांच्या चेहºयावर भयग्रस्त निकाल उमटू लागला असून,कार्यकर्त्यांचे चेहरे बोलू लागल्याने सर्वसामान्य मतदारांना आपसूचक निकाल हाती मिळत आहे. काहींना आपल्याच ‘ताकदी’वर परीक्षा द्यावी लागत असताना काही उमेदवारांना मात्र बाहेरून ताकद मागवावी लागत आहे. उमेदवारांची खरी परीक्षा तर कार्यकर्त्यांच्या बळावर अवलंबून असून, उमेदवारांसाठी त्यांचे कार्यकर्ते समोरासमोर उभे राहून इतरांशी पंगा घेताना दिसत आहेत.

टॅग्स :MalegaonमालेगांवMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019