शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

बिर्याणी खाण्याच्या वादातून लासलगावी एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 19:28 IST

लासलगाव : पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या बाजारतळ येथे बिर्याणी खाण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाल्याची घटना सोमवारी (दि.८) घडली.

ठळक मुद्देजखमी सुरेश पाथरेला ग्रामीण रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

लासलगाव : पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या बाजारतळ येथे बिर्याणी खाण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाल्याची घटना सोमवारी (दि.८) घडली.संजय नगर येथील सुरेश सहादु पाथरे यास लाथा बुक्याने मारहाण करत जखमी केले आहे. या भागामध्ये हातगाड्यावर अवैधरित्या मोठ्या प्रमाणात दारूची विक्र ी केली जाते. आणि यातून वाद होत या परिसरामध्ये मोठी दहशत माजवली जाते सर्वसामान्य नागरिकांना आणि विशेषत: महिलांना या भागातून सायंकाळी चालणे सुध्दा मुश्कील होत आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सोमवारी रात्री ९ च्या सुमारास सुरेश पाथरे हा शमसुद्दीन असलम शेख यांच्या हातगाडीवर बिर्याणी खाण्यासाठी गेला होता. आॅर्डर देऊनही बिर्याणी येत नसल्याने सुरेश पाथरे व शमसुदिन शेख, इम्रान अकील मंन्सुरी, मोसिन अकील मन्सुरी, मुजमिल इरफान शेख यांच्यात बाचाबाची झाली, त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले.इम्रान मन्सुरी याने गाड्या जवळच असलेली खुर्ची उचलत फिर्यादी सुरेश पाथरेच्या डोक्यात मारल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी सुरेश पाथरेला ग्रामीण रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर. एस. जोपळे पुढील तपास करीत आहेत.