शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बार असोसिएशन निवडणूक : उमेदवार एका व्यासपीठावर

By admin | Updated: July 9, 2017 00:34 IST

नाशिक : जिल्हा न्यायालयास भेडसावणारा पार्किंगचा प्रश्न, मोफत वायफाय अशी आश्वासने जिल्हा न्यायालयातील वकील उमेदवाांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : वकील हे केंद्रबिंदू मानून त्यांना भेडसावणाऱ्या दैनंदिन अडचणींच्या निराकरणाबरोबरच जिल्हा न्यायालयास भेडसावणारा पार्किंगचा प्रश्न, महिलांसाठी स्वतंत्र शौचालय, अद्ययावत लायब्ररी, वकीलांसाठी बार रुम, नवीन वकीलांना सोयी-सुविधा याबरोबरच न्यायालयात मोफत वायफाय अशी आश्वासने जिल्हा न्यायालयातील वकील उमेदवाांनी जिल्हा न्यायालयात आयोजित कार्यक्रमात दिली़ यावेळी काही उमेदवारांनी आपल्या कामांच्या जंत्री सादर करीत तर काहींनी भावनिक साद घालत निवडून देण्याचे आवाहन केले़महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष काक़ा़घुगे, जिल्हा सरकारी वकील अजय मिसर, माजी अध्यक्ष भास्करराव पवार, माजी जिल्हा सरकारी वकील वसंत पेखळे यांनी आयोजित केलेल्या या विशेष सभेत उमेदवारांनी निवडून आल्यानंतर वकीलांच्या दैनंदिन समस्यांवरील उपाययोजनांबाबत माहिती व त्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांबाबत मतदारांना माहिती दिली़ अध्यक्षपदाची उमेदवार अ‍ॅड़नितीन ठाकरे, अ‍ॅड़श्रीधर माने, अ‍ॅड़महेश अहेर, अ‍ॅड़अशोक आव्हाड, अ‍ॅड़झुंझार आव्हाड अ‍ॅड़विजय मोरे यांच्यासह सर्व पदांसाठी उमेदवारी करणाऱ्या वकीलांनी निवडून देण्याचे आवाहन केले़ अध्यक्षपदासाठी उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांकडून प्रामुख्याने पार्किंगचा प्रश्न, पोलिसांकडून मिळालेले जागेवर तयार होणाऱ्या इमारतींमध्ये वकीलांसाठी बाररुम, वकीलांसाठी विमा, महिलांसाठी स्वतंत्र शौचालय, नवीन वकीलांसाठी स्टायपेंड, वकीलांसाठी नवीन कायद्यांबाबत मार्गदर्शन, न्यायाधीशांकडून केले जाणारा अपमान, तारखा, बार रुम, लायब्ररी या प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली़ तर काहींनी विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कामकाजावर आक्षेप नोंदवत बदल घडविण्याची तसेच सक्षम नेतृत्वाची आवश्यकता विशद केली़ बार असोसिएशनच्या निवडणुकीत उमेदवारांनी टिकाटिप्पणीबाबत विद्यमान अध्यक्षांनी चांगलीच टिप्पणी केली़ बारने वकीलांसाठी विविध योजना, पार्किंगच्या प्रश्नातील खो, आयएसओ मानांकन, नवीन जागेसाठी केलेले प्रयत्न याबाबत खुलासे केले़ यावेळी विद्यमान अध्यक्ष व अध्यक्षपदावरील उमेदवारांबाबत शब्दिक चकमक व असंसदीय शब्दाचा वापरही करण्यात आला़ जिल्हा न्यायालयातील वकीलांची संघटना नाशिक बार असोसिएशनच्या निवडणुकीच्या मतदानास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत़ या निवडणुकीत ५६ उमेदवार रणांगणात असून मतदारसंख्या ३ हजार ५६ इतकी आहे़ उमेदवारांनी प्रचारासाठी सोशल मीडीया वापराबरोबरच पत्रकांद्वारे संवाद साधला जातो आहे़