शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

मंडळांच्या मंडपात ‘पीओपी’चेच बाप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:51 IST

शाडूमातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासंदर्भात महापालिकेसह विविध संस्थांनी जनजागृती करूनही यंदा काही मोजक्या मंडळांचा अपवाद वगळता बव्हंशी सार्वजनिक गणेश मंडळांनी पीओपी अर्थात प्लॅस्टर आॅफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्तींचीच प्राणप्रतिष्ठा करत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला हरताळ फासला आहे. याउलट, घराघरांमध्ये असंख्य कुटुंबीयांनी पीओपीला फाटा देत शाडूच्या मूर्तींना पसंती दिली आहे.

नाशिक : शाडूमातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासंदर्भात महापालिकेसह विविध संस्थांनी जनजागृती करूनही यंदा काही मोजक्या मंडळांचा अपवाद वगळता बव्हंशी सार्वजनिक गणेश मंडळांनी पीओपी अर्थात प्लॅस्टर आॅफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्तींचीच प्राणप्रतिष्ठा करत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला हरताळ फासला आहे. याउलट, घराघरांमध्ये असंख्य कुटुंबीयांनी पीओपीला फाटा देत शाडूच्या मूर्तींना पसंती दिली आहे. नाशिक शहरात गोदावरीसह नासर्डी, वालदेवी, दारणा आदी नदीपात्रांमध्ये दरवर्षी लाखो गणेशमूर्तींचे विसर्जन होत असते. त्यात मोठ्या प्रमाणावर ‘पीओपी’पासून तयार केलेल्या मूर्तींचा समावेश असल्याने नदीपात्रात जलप्रदूषणाचा सामना करावा लागत असतो. पीओपीच्या मूर्तींचे पाण्यात विघटन होत नाही शिवाय, मूर्तिकामासाठी वापरण्यात येणाºया रंगांमध्येही रासायनिक घटकांचा समावेश असल्याने जलप्रदूषणात अधिक भर पडते. गेल्या काही वर्षांपासून शहरात गोदावरीसह अन्य नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न गाजतो आहे. काही पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिकेद्वारे नदीप्रदूषणाकडे लक्ष वेधले आहे. त्यातूनच महापालिकेला स्वतंत्ररीत्या गोदावरी संवर्धन कक्षाची स्थापना करणे भाग पडले आणि त्यामार्फत गोदाघाट परिसराची कायमस्वरूपी स्वच्छता राखण्यावर भर दिला जात आहे. महापालिकेमार्फत जलप्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असतानाच नदीपात्रात निर्माल्यासह प्लॅस्टिक पिशव्या तसेच रासायनिक घटक असलेली साधने टाकू नयेत, याकरिता अनेक स्वयंसेवी-सेवाभावी संस्था जनजागृतीचे कार्य करत असतात. या जागृतीचाच एक भाग म्हणून दरवर्षी गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींऐवजी शाडूमातीपासून तयार केलेल्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्याचा आग्रह धरला जातो.मंडळांना भव्यतेचे आकर्षणसार्वजनिक मंडळांना मूर्तीच्या भव्यतेचे आकर्षण असते. त्यातूनच १० ते १५ फुटांपर्यंतच्या मूर्ती बसविण्यासाठी चढाओढ लागते. मात्र भव्य, जास्त उंचीची मूर्ती ही शाडूमातीकामात उपलब्ध होत नसल्याने नाइलाजास्तव पीओपीची मूर्ती आणावी लागत असल्याचे मंडळांच्या पदाधिकाºयांचे म्हणणे आहे. काही मंडळांकडून अशा जास्त उंचीच्या मूर्ती विसर्जित न करता त्यानंतरच्या वर्षी अन्य दुसºया मंडळांना अथवा दुसºया शहरात पाठविल्या जात असतात. मोठ्या मूर्तींऐवजी छोटी मूर्ती विसर्जित केली जात असल्याचेही पदाधिकाºयांकडून सांगण्यात आले.