शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक, निफाड कारखाना सुरू करण्याचे बॅँकेचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 04:11 IST

कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेल्या परंतु विक्रीही न करता येऊ शकलेला नाशिक व निफाड सहकारी साखर कारखाना आता भाडेतत्त्वावरच चालविण्यास देऊन त्यातून कर्जवसुली करण्याचे प्रयत्न नाशिक जिल्हा बॅँकेने सुरू केले आहेत.

- श्याम बागुलनाशिक - कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेल्या परंतु विक्रीही न करता येऊ शकलेला नाशिक व निफाड सहकारी साखर कारखाना आता भाडेतत्त्वावरच चालविण्यास देऊन त्यातून कर्जवसुली करण्याचे प्रयत्न नाशिक जिल्हा बॅँकेने सुरू केले आहेत.त्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. दोन्ही कारखान्यांसाठी चार खासगी कंपन्यांनी तयारी दर्शविली असली तरी, पाच ते सहा कोटी रुपये अनामत भरण्यास या कंपन्यांनी असमर्थता व्यक्त केल्याने त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.नाशिक सहकारी कारखान्याकडे जिल्हा बॅँकेचे १५७, तर निफाड सहकारी कारखान्याकडे १२५ कोटी रुपये कर्ज अनेक वर्षांपासून थकले आहे. कर्जबाजारीपणा, खेळत्या भांडवलाचा अभाव, कर्मचाऱ्यांच्या देणी यामुळे आर्थिकदृष्ट्या जर्जर झालेले हे दोन्ही कारखाने बंद पडून जिल्हा बँकेने थकबाकीपोटी जप्त केले आहेत.त्यामुळे कारखान्याकडे असलेल्या थकबाकीवर चक्रवाढ व्याजाचा डोंगर दिवसागणिक वाढत चालला आहे. शिवाय कारखाना सुरू करण्यासाठी करण्यात आलेले राजकीय व शासकीय प्रयत्नही अनेक वेळा फसल्यामुळे बँकेने कारखाना विक्री करण्यासाठी वेळोवेळी जाहिराती काढल्या, परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही.शासनानेच सहकारी साखर कारखाने विक्रीवर निर्बंध लावल्यामुळे बॅँकेने विक्रीचा निर्णय बदलून भाडेतत्त्वावर चालविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेnewsबातम्या