कळवण - येथील पोलीस स्टेशन हद्दीतील बँकेतील व बँकेच्या आवारातील सीसीटीव्ही कँमेऱ्यांची योग्य देखभाल ठेवण्याची आवश्यकता असून सुरक्षारक्षकांनी नेहमीच सजग राहणे गरजेचे आहे. बँका व पतसंस्थांनी सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क रहावे असे आवाहन कळवणचे पोलिस निरिक्षक प्रमोद वाघ यांनी केले. वाघ यांनी कळवण शहरातील बँकांचे अधिकारी,व्यवस्थापक यांच्याशी संवाद साधत सुरक्षेसंबंधी करावयाच्या उपाययोजनांची माहीती दिली. शहरात बँकांची संख्या लक्षणीय असून, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ठोस उपाययोजना राबवणे हे अत्यंत आवश्यक असल्याचे वाघ यांनी सांगितले. सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, सीसीटीव्ही कॅमेºयांचा दर्जा आणि बसविण्याची पद्धत याशिवाय इतर अनेक महत्त्वाच्या बाबींवर यावेळी चर्चा झाली.सीसीटीव्ही कॅमेºयांचा दर्जा चांगला असावा, डीव्हीआर व एनव्हीआर सुरिक्षत ठिकाणी ठेवावे,अलार्म बटणांची रचना,त्याचा वापर याची माहिती कर्मचाºयांना असायला हवी. प्रत्येक वीस-वीस मिनिटानंतर सीसीटीव्ही फुटेज चेक करावे.काही संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाली आढळल्यास त्वरीत सुरक्षारक्षकांनी सतर्क रहावे व पोलिसांना तत्काळ माहिती कळवावी अशा सुचना वाघ यांनी केल्या.
कळवण पोलिस स्टेशनमध्ये बॅँक अधिकाऱ्यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 17:43 IST