शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगड विद्युत मंडळासह बॅँकेची ९ लाखाची फसवणुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 19:31 IST

रायपूर येथील सी सी खात्यात ८ लाख ८० हजार ९२९ रुपयांचा बनावट धनादेश जमा केला. त्यातील ८ लाख ७९ हजार ६६५ रूपयांची रक्कम काढून घेत अपहार केला.

ठळक मुद्देछत्तीसगढला घडलेल्या घटनेचा नाशकात गुन्हा

नाशिक : बनावट धनादेशाद्वारे दोन चोरट्यांनी छत्तीसगड विद्यूत वितरण कंपनी तसेच कंपनीचे खाते असलेल्या पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेची ९ लाख १६ हजार २०० रूपयांची फसवणुक केली आहे. सबंधीत बँकेचे क्लीअरन्स कार्यालय नाशिकला असल्यामुळे या फसवणूकप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र सहकारी बॅँक व अभ्युद्य बँक कॅनडा कॉर्नर शाखेचे व्यावस्थापक राजभोज यांनी याप्रकरणी तक्र ार दाखल केली आहे. त्यानुसार २६ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०१८ या कालावधीत संशियत करिष्मा मनुभाई सेलवाडीया याने पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को आॅप बँकेच्या कॅनडा कॉर्नर येथील शाखेसह त्याचा छत्तीसगड राज्य विद्यूत वितरण कंपनीचा युनीयन बॅँक आॅफ इंडियाच्या पुराणी वस्ती लिला चौक, रायपूर येथील सी सी खात्यात ८ लाख ८० हजार ९२९ रुपयांचा बनावट धनादेश जमा केला. त्यातील ८ लाख ७९ हजार ६६५ रूपयांची रक्कम काढून घेत अपहार केला.तर दुसऱ्या एका प्रकरणात अशाच पध्दतीने दुसरा संशियत गणपत रावजी गायकवाड याने त्याचा अभ्युद्य बँकच्या कॅनडा कॉर्नर शाखेत पुन्हा छत्तीसगढ राज्य विद्यूत वितरण कंपनीचा युनीयन बँक आॅफ इंडियाच्या रायपुर येथील शोखतुन १९ लाख ५० हजार ९३० रूपयांचा बनावट चेक करून स्वत:च्या खात्यावर वटविला. यातील रकमेचा अपहार सुरू असल्याचे लक्षात येताच बॅँकेकडून सदर खाते तत्काळ गोठविण्यात आले; मात्र तोपर्यंत संशयिताने ३५ हजार ३४९ रुपयांचा अपहार केलेला होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. फसवणूकीचे हे दोन्ही प्रकार लक्षात आल्यानंतर छत्तीसगढ विद्यूत वितरण कंपनी व बँकेने चौकशी केली. अंतर्गत चौकशीनंतर अखेर पंजाब व महाराष्ट्र को आॅप बंकेचे क्लिअरींग हाऊस नाशिक येथे असल्याने व येथून ते चेक पुढे पास करण्यात आल्याने या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरिक्षक संदिप पवार करत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयfraudधोकेबाजी