शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सिडको परिसरातील बँक, एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:23 IST

परिसरातील बँक व एटीएममध्ये सुरक्षाव्यवस्था वाºयावर सोडल्याचे निदर्शनास येत आहे. याचा फायदा घेत चोरट्यांनी आपली हात की सफाई सुरू केल्याच्या घटना घडणे नित्याचेच झाले आहे. या पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांनी बँकांना काळजी घेण्याच्या सूचना केल्या

सिडको : परिसरातील बँकएटीएममध्ये सुरक्षाव्यवस्था वाºयावर सोडल्याचे निदर्शनास येत आहे. याचा फायदा घेत चोरट्यांनी आपली हात की सफाई सुरू केल्याच्या घटना घडणे नित्याचेच झाले आहे. या पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांनीबँकांना काळजी घेण्याच्या सूचना केल्या असून, नियम ना पाळणाºया बँक व एटीएमला स्वत:ला जबाबदार धरण्यात येणार असल्याचे सांगत कानउघाडणी केली आहे.गेल्या काही दिवसांपासून बँकांच्या शाखांना व एटीएममधून खातेधारकांना विविध प्रकारे बतावणी करून त्यांच्याकडून रोख रक्कम चोरी करण्याच्या घटना शहरात घडत आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात अशाप्रकारचे गुन्हे दाखल झाल्याच्या घटनांची नोंद आहे. या घटना लक्षात घेऊन अंबड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाºया विविध बँक शाखा व एटीएमची सुरक्षता बँकांनी स्वत: घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. याकरिता बँक व एटीएममध्ये सीसीटीव्ही लावणे, सुरक्षारक्षक नेमणे, सायरन लावणे, सुरक्षा फलक लावणे, स्पीकरवर ग्राहकांना सूचना देणे, अशा प्रकारच्या नियमांची पूर्तता न करणाºया व भविष्यात काही दुर्घटना घडल्यास बँकेलाच जबाबदार धरण्यात येणार आहे. सुरक्षेसंदर्भाची महिती अंबड पोलीस स्टेशनला देण्याचे आवाहन लेखी पत्राद्वारे बँकांना कळविण्यात आले असल्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी दिले आहे.बँकेलाच जबाबदार धरणारबँक व एटीएममध्ये सीसीटीव्ही लावणे, सुरक्षारक्षक नेमणे, सायरन लावणे, सुरक्षा फलक लावणे, स्पीकरवर ग्राहकांना सूचना देणे अशा प्रकारच्या नियमांची पूर्तता न करणाºया व भविष्यात काही दुर्घटना घडल्यास बँकेलाच जबाबदार धरण्यात येणार आहे.

टॅग्स :bankबँकPoliceपोलिसatmएटीएम