शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशी तरुणी  ‘ऊर्मी’ वात्सल्यमधून गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 01:21 IST

शहरातील वात्सल्य महिला आधाराश्रमातून दोन मुली रविवारी (दि़ २) रात्री अचानक गायब झाल्याची घटना घडली आहे़ मेधा अशोक चव्हाण (१९) व ऊर्मी सिराजुल्ला इस्माईल (१९)अशी गायब झालेल्या मुलींची नावे असून, यापैकी ऊर्मी सिराजुल्ला इस्माईल हिने स्वत:ची कुंटणखान्यातून सुटका केली होती़ तसेच या गुन्ह्याबाबत सद्यस्थितीत न्यायालयीन प्रकियादेखील सुरू आहे़ दरम्यान, या मुलींच्या गायब होण्यामध्ये सेक्स रॅकेटमधील काही संशयितांचा सहभाग असल्याची तसेच ऊर्मीसोबत काहीतरी बरेवाईट झाल्याची चर्चा आहे़

नाशिक : शहरातील वात्सल्य महिला आधाराश्रमातून दोन मुली रविवारी (दि़ २) रात्री अचानक गायब झाल्याची घटना घडली आहे़ मेधा अशोक चव्हाण (१९) व ऊर्मी सिराजुल्ला इस्माईल (१९)अशी गायब झालेल्या मुलींची नावे असून, यापैकी ऊर्मी सिराजुल्ला इस्माईल हिने स्वत:ची कुंटणखान्यातून सुटका केली होती़ तसेच या गुन्ह्याबाबत सद्यस्थितीत न्यायालयीन प्रकियादेखील सुरू आहे़ दरम्यान, या मुलींच्या गायब होण्यामध्ये सेक्स रॅकेटमधील काही संशयितांचा सहभाग असल्याची तसेच ऊर्मीसोबत काहीतरी बरेवाईट झाल्याची चर्चा आहे़ विशेष म्हणजे, महिला पोलिसांची सुरक्षितता असताना हा प्रकार घडला असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात केवळ हरविल्याची नोंद करण्यात आली आहे़  दरम्यान, सद्यस्थितीत वात्सल्यमध्ये ३० महिला व मुली असून, यापैकी केवळ या दोघीच कशा गायब झाल्या, वात्सल्यमधून त्या कशा आणि कधी बाहेर पडल्या याबाबत अधीक्षकांकडून माहिती दिली जात नाही़ तसेच यापूर्वीही वात्सल्यमधून मुली पळून गेल्या असून, त्यांची संख्या किमान पाच ते दहा अशी होती़ यावेळी मात्र दोनच मुली गायब झाल्याने त्यातही एक सेक्स रॅकेटमधील मूळ फिर्यादी असल्याने या रॅकेटमधील संशयितांना वाचविण्यासाठी तर त्यांना गायब करण्यात आले नाही ना याबाबत चर्चा सुरू आहे़ दरम्यान, वात्सल्य महिला वसतिगृहातील कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष व त्यांच्या शोधासाठी सरकारवाडा पोलिसांची उदासीनता याबाबत संशय निर्माण झाला आहे़  सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील सेक्स रॅकेटमध्ये अडकल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनंतर ऊर्मीने स्वत:च्या हिमतीने सुटका करून घेतली होती़ यानंतर मीडियासमोर येत ऊर्मीने मुसळगाव सेक्स रॅकेटचा पोलखोल करून सिन्नरमधील कुंटणखाना चालविणारी नानी गंगावणे, तिचा मुलगा विशाल गंगावणे व एकावर पोस्को तसेच विविध कलमांनुसार गुन्हे दाखल असून, ते कारागृहात आहेत. या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच ही मुलगी गायब झाल्याने एकूण प्रकाराबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय