शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशी मुलीची तस्करी : संशयित आरोपी माजिदा अद्याप फरार सिन्नरमधील कुंटणखान्याच्या ‘नानी’सह तिघांना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 01:10 IST

बांगलादेशी मुलीची देहविक्रयसाठी खरेदी करणाºया सिन्नरमधील मुसळगावच्या कुंटणखान्याची मालकीण संशयित नानी ऊर्फ मंगल नंदकिशोर गंगावणेसह पीडितेवर बलात्कार करणारा नानीचा मुलगा संशयित विशाल नंदकिशोर गंगावणे व दलाल सोनू नरहरी देशमुख या तिघा संशयित आरोपींना जिल्हा न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

नाशिक : बांगलादेशी मुलीची देहविक्रयसाठी खरेदी करणाºया सिन्नरमधील मुसळगावच्या कुंटणखान्याची मालकीण संशयित नानी ऊर्फ मंगल नंदकिशोर गंगावणेसह पीडितेवर बलात्कार करणारा नानीचा मुलगा संशयित विशाल नंदकिशोर गंगावणे व दलाल सोनू नरहरी देशमुख या तिघा संशयित आरोपींना जिल्हा न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पीडित मुलीला देहविक्रयाच्या नरकात ढकलणारी तिची मावशी व काही दलाल अद्याप फरार असून, त्यांचा शोध ग्रामीण पोलीस घेत आहेत. वेश्या व्यवसायासाठी मावशीने आपल्या भाचीला बांगलादेशामधून भारत फिरविण्याच्या बहाण्याने आणत सिन्नर तालुक्यातील मुसळगाव परिसरात चालणाºया कुंटणखाण्याच्या ‘नानी’ला दहा महिन्यांपूर्वी विकल्याची धक्कादायक माहिती बुधवारी पीडित मुलीने सांगितलेल्या आपबितीनंतर अवघे राज्य हादरले होते. पीडित मुलीचा सौदा ‘नानी’ने मुंबईच्या कुंटणखान्यासाठी केला आणि काही महिने मुंबईला पीडित मुलगी राहिली व तेथून पुन्हा तिला कोलकात्यात देहविक्र यासाठी विकले गेले, असा तिचा संपूर्ण प्रवास पीडित मुलीने बुधवारी नाशिकमध्ये येऊन माध्यमांसमोर मांडला. यानंतर ग्रामीण पोलीस दलासह अवघ्या राज्याला हादरा बसला. पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी याबाबत दखल घेऊन तत्काळ उपअधीक्षक विशाल गायकवाड यांना त्वरित तपासचक्रे फिरवून संशयित आरोपींना अटक करण्याचे फर्मान बजावले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांच्या पथकाने सिन्नर येथे जाऊन संशयित नानीचा मुलगा व दलालाला बुधवारी मध्यरात्री ताब्यात घेतले व गुरुवारी नानीच्या मुसक्या आवळल्या. यासर्व संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सिन्नर औद्योगिक वसाहत पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे पीडित मुलीने दिलेल्या जबाबावरून पुढे आले आहे. सिन्नर पोलिसांनी दहा महिन्यांपूर्वी दखल घेऊन बांगलादेशी मुलीची खरेदी करणाºया ‘नानी’ला खाकीचा हिसका दाखविला असता तर कदाचित ती मुलगी मुंबई येथून पोलिसांना मिळाली असती व तिचा कोलकात्याचा ‘सौदा’ टळला असता अशी चर्चा सुरू आहे. एकूणच या प्रकरणाच्या तपासाकडे जिल्ह्णासह राज्याचे लक्ष लागले असून पीडित मुलगी बांगलादेशला तिच्या कुटुंबापर्यंत कधी पोहचणार याकडे लक्ष लागले आहे.जुन्या नाशिकमधून दोघांना अटकनाशिक बांगलादेशी मुलीची देहविक्रीसाठी दहा महिन्यांपूर्वी तिच्या मावशीकडून सिन्नरच्या मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील कुंटणखान्याच्या ‘नानी’ला विक्री केल्याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी दोघा संशयितांना जुने नाशिकमधून अटक केली आहे. बांगलादेशी युवतीला खोटे बोलून तिची मावशी माजिदा अब्दुल हिने दलालामार्फत भारतात पोहचविले. या प्रकरणात माजिदा अद्याप फरार असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत. पोलिसांच्या पथकाने जुन्या नाशिकमधून संशयावरून आसिफ फारूख शेख (२६, रा. चौकमंडई), सिद्धार्थ गौतम सोनकांबळे (२१, रा.भीमवाडी) या दोघांना ताब्यात घेतले आहे. दोघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या २० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. एकूणच बांगलादेशी युवतीच्या तस्करीच्या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, या प्रकरणात बहुसंख्य संशयितांच्या मुसक्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी तीन पथके तपासासाठी नियुक्त केली आहेत.