शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बंदीवानांनी क्र यशक्तीचा उपयोग देशहितासाठी करावा : सावरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:04 IST

बंदीवानांमधील क्रयशक्ती ही राष्ट्रहितासाठी उपयोगी कशी पडेल याचा विचार त्यांनीच स्वत:च्या पातळीवर करावा तसेच तिथून बाहेर आल्यानंतर त्या अनुषंगाने आपापल्या पातळीवर कार्य करण्यास प्रारंभ करावा, असे विचार स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केले.

नाशिकरोड : बंदीवानांमधील क्रयशक्ती ही राष्ट्रहितासाठी उपयोगी कशी पडेल याचा विचार त्यांनीच स्वत:च्या पातळीवर करावा तसेच तिथून बाहेर आल्यानंतर त्या अनुषंगाने आपापल्या पातळीवर कार्य करण्यास प्रारंभ करावा, असे विचार स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केले. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक पुरस्कृत व रामचंद्र प्रतिष्ठान संचालित निबंध व अन्य स्पर्धा आयोजित करण्यात आली, त्यात अनेक महिला व पुरुष स्पर्धकांनी भाग घेतला. त्यानंतर नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आयोजित पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्नुषा स्वामिनी सावरकर, कारागृहाचे अधीक्षक राजकुमार साळी, टी. एस. निंबाळकर, आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत कर्मचारी वर्गानेही सहभाग घेतला होता. त्यांनाही पारितोषिक वितरण करण्यात आले. शिक्षक आकाश माळी यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. तुरुंगाधिकारी पल्लवी कदम यांनी प्रास्ताविक केले, तर आभार स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी मानले. सूत्रसंचालन रामचंद्र प्रतिष्ठानचे अशोक शिंदे यांनी केले.स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच क्रांतिकार्यात सहभागी झालेल्यांचा आदर्श ठेवत आपल्यातील देशभक्तींचे विचार जीवनात उत्तरोत्तर वृद्धिंगत करण्यावर भर द्यावा, असे आवाहन अधीक्षक राजकुमार साळी यांनी केले. आजदेखील समाजासाठी विशेष काही करून दाखविण्याची क्षमता तुमच्यात असून, त्या अनुषंगानेही राष्ट्रपुरु षांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. या स्पर्धेचे परीक्षण केलेल्या स्वामिनी सावरकर यांनी स्पर्धकांच्या विचारांचे कौतुक केले तसेच त्यांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :Nashikनाशिक