शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत खासगी वाहनांना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:17 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या आवारात कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर लोक वाहने उभी करून निघून जात असल्याने निर्माण होणाºया वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी जिल्हा परिषद आवारात खासगी वाहनांना बंदी केली असून, जिल्हा परिषदेचे ओळखपत्र असणाºयांचीच वाहने आवारात यापुढे उभी राहणार आहेत. सायंकाळी स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी गेटवर उभे राहून ओळखपत्राची तपासणी केली.

ठळक मुद्दे ओळखपत्र आवश्यक : मुख्य कार्यकारी अधिकारी स्वत: गेटवर

नाशिक : जिल्हा परिषदेच्या आवारात कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर लोक वाहने उभी करून निघून जात असल्याने निर्माण होणाºया वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी जिल्हा परिषद आवारात खासगी वाहनांना बंदी केली असून, जिल्हा परिषदेचे ओळखपत्र असणाºयांचीच वाहने आवारात यापुढे उभी राहणार आहेत. सायंकाळी स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी गेटवर उभे राहून ओळखपत्राची तपासणी केली.जिल्हा परिषदेतील वाहततळाचा मुद्दा अत्यंत ज्वलंत असून, सदस्य, पदाधिकारी आणि बाहेरील व्यक्तींच्या वाहनामुळे वाहनतळावर वाहने उभी करणे कठीण होते. जिल्हा परिषदेची दर्शनी बाजू आणि मागील बाजूस नवीन इमारतीसमोरदेखील मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जात असल्याने पायी चालणेदेखील कठीण होते. जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांव्यतिरिक्त परिसरातील बॅँका, खासगी व्यावसायिकांचे कर्मचारी जिल्हा परिषदेच्या आवारात वाहने उभी करून निघून जात होते. यामुळे संपूर्ण इमारतीला दुचाकी वाहनांचा वेढा पडलेला असायचा. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी आता याप्रकाराला आळा घातला असून, जिल्हा परिषदेचे आवार मोकळे झाले आहे.जिल्हा परिषदेच्या आवारात जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांव्यतिरिक्त अन्य खासगी वाहनधारक वाहने लावत असल्याची बाब निदर्शनास आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी स्वत: जिल्हा परिषदेच्या गेटवर उभे राहून वाहनधारकांच्या ओळखपत्राची तपासणी केली. यापुढे ओळखपत्राशिवाय कुणालाही जिल्हा परिषद आवारात वाहन लावण्यास मनाई करण्यात येणार असून, अनधिकृतपणे वाहन लावल्यास कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना डॉ. गिते यांनी प्रशासन विभागाला दिल्या आहेत.पार्किंगची नवीन जागाजिल्हा परिषद आवारात वाहन पार्किंगची मोठी समस्या निर्माण होत असून, यासाठी डॉ. गिते यांनी जिल्हा परिषदेच्या मागील बाजूस (नवीन इमारतीसमोर नाही) वाहन लावण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्या संख्येपेक्षा अधिक वाहने पार्किंगमध्ये उभी केली जात असल्याने सदरची वाहन बाहेरील व्यक्तींची असल्याचे दिसून आले आहे. सोमवारी सायंकाळी सुटी झाल्यानंतर डॉ. गिते यांनी गेटवर उभे राहून कर्मचाºयांच्या ओळखपत्रांची तपासणी केली. यापुढे सकाळी येताना व सायंकाळी जाताना सर्व वाहनधारकांचे ओळखपत्र तपासूनच त्यांना आत सोडले जाणार आहे.