येवला : मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरात पतंगांची मजा लुटताना रंगाचा बेरंग होऊ नये, म्हणून नायलॉन दोऱ्यावर बंदी घालण्यात आली असून, कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन येवला शहर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे. १४ ते १६ जानेवारीदरम्यान साजऱ्या होणाऱ्या पतंगोत्सवात नायलॉन दोरा वापरू नये, कारण हा दोरा मजबूत असतो. त्यामुळे शारीरिक जखमा होतात व जखमा गंभीर स्वरूपाच्या असतात. त्यामुळे असे अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दुकानदारांनी नायलॉन दोरा विक्र ीसाठी ठेवू नये. दुकानदाराकडे नायलॉन दोरा आढळल्यास त्याच्यावर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच कोणीही नायलॉन दोऱ्याचा वापर करून पतंग उडविताना दिसून आला तर त्याच्यावरदेखील कारवाई करण्याचा इशारा येवला पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आला आहे.नायलॉन दोऱ्यासंदर्भात चौकशी व धाडसत्र पथक तयार करण्यात आले असून, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास निंबाळकर, उपनिरीक्षक रामदास बैरागी, हवालदार अभिमन्यू अहेर, गोरख पवार, योगेश हेबाडे, कैलास महाजन, भाऊसाहेब टिळे, राजेंद्र बिन्नर, काशीनाथ देवरे, गीता शिंदे हे या पथकात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांनी दिली. (वार्ताहर)
येवले शहरात नायलॉन मांजा विक्र ी-वापरावर बंदी
By admin | Updated: December 7, 2015 23:13 IST