शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जैविक औषधांवरील बंदी अन्यायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 01:10 IST

राज्यात कृषी खात्याने परवाना दिलेल्या कृषी सेवा विक्री केंद्रांना नोंदणी नसलेल्या खते, कीटकनाशकांची विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यवतमाळ आणि राज्यातील अन्य काही ठिकाणी कीटकनाशकांच्या वापरामुळे मजुरांच्या मृत्यूनंतर सदर निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात कीटकनाशक कायदा १९५८ च्या यादीत समाविष्ट नसलेल्या बिगर नोंदणीकृत पीकवाढ संजीवकांची तसेच खत नियंत्रण आदेश १९८५ मध्ये समाविष्ट नसलेल्या भूसुधारकांची व इतर उत्पादनांची विक्री यामुळे बाधित झाली आहे.

नाशिक : राज्यात कृषी खात्याने परवाना दिलेल्या कृषी सेवा विक्री केंद्रांना नोंदणी नसलेल्या खते, कीटकनाशकांची विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यवतमाळ आणि राज्यातील अन्य काही ठिकाणी कीटकनाशकांच्या वापरामुळे मजुरांच्या मृत्यूनंतर सदर निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात कीटकनाशक कायदा १९५८ च्या यादीत समाविष्ट नसलेल्या बिगर नोंदणीकृत पीकवाढ संजीवकांची तसेच खत नियंत्रण आदेश १९८५ मध्ये समाविष्ट नसलेल्या भूसुधारकांची व इतर उत्पादनांची विक्री यामुळे बाधित झाली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सेंद्रिय बाजारपेठ नष्ट करण्याचा डाव आखला गेल्याचा आरोप शेतकरी आणि कृषी केंद्र विक्रेत्यांकडून केला जात आहे. यवतमाळमध्ये विषबाधा प्रकरण नोंदणीकृत रासायनिक कीटकनाशकांमुळेच घडल्याने त्याचा सेंद्रिय उत्पादनांशी संबंध जोडू नये, अशी अपेक्षा विक्रेते व्यक्त करीत आहेत.यवतमाळ येथील घटनेनंतर कीटकनाशक विक्रेते, शेतकरी आणि मजूर एका वेगळ्याच प्रसंगाला तोंड देत आहेत. मजुरांच्या मृत्यूनंतर सरकारने थेट जैविक, सेंद्रिय आणि पीजीआरवर बंदी घातल्याने समस्या अधिकच वाढली आहे. हा निर्णय सर्वंकष आणि चर्चेअंती होणे अपेक्षित असताना केवळ एकाएकी घातलेल्या अशा प्रकारच्या बंदीमुळे सारेच अडचणीत आले आहेत. वास्तविक यामुळे मजूर सुरक्षित झाले की दुकानदार याची कोणतीही मोजपट्टी शासनाला देता आलेली नाही. बंदीची मागणी ना मजुरांकडून करण्यात आली, ना विक्रेत्यांकडून. तरीही कोणताही अभ्यास न करता जैविक औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. खरे तर सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याचा हा काळ मानला जातो. किंबहुना सेंद्रिय शेतमालाला बाजारपेठ देशातच नव्हे तर परदेशातही मिळण्याची दाट शक्यता असताना त्यासाठी प्रोत्साहनपर योजना अपेक्षित आहेत. रसायनविरहित शेती असणे असे आंतरराष्टÑीय आणि राष्टÑीय धोरण असताना सेंद्रिय आणि जैविक उत्पादनावर बंदी कशी घालण्यात आली हे न उलगडणारे कोडे असल्याचे वितरक आणि शेतकºयांचेदेखील म्हणणे आहे.सेंद्रिय शेती व जैविक शेतीला सुगीचे दिवस येऊ पाहत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीला प्राधान्य देतात. किंबहुना बाजारातील ग्राहकही सेंद्रिययुक्त पिकांचीच विचारणा करीत असल्याने अशा जैविक आणि सेंद्रिय शेतीयुक्त औषधांची मोठी गरज आणि मागणी निर्माण झालेली आहे. मात्र त्यावरच सरकारने बंदी घातल्याने फळबाग करणाºया शेतकºयांचे मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकºयांनीदेखील या बंदीवर नाराजी व्यक्त केली आहे.