शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
2
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
3
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
4
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
6
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
7
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
8
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
9
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
10
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
12
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
13
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
14
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
15
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
16
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
17
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
18
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
19
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
20
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार

कुस्तीस्पर्धेत बाळू बोडकेस सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 14:48 IST

नांदूरवैद्य -: इगतपुरी तालुक्यातील साकुर फाटा येथील गुरु हनुमान कुस्ती आखाड्यात कुस्तीचे धडे गिरवणारा ञ्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध कुस्तीपटू बाळू बोडके याने हरियाणा येथील किवाणी येथे झालेल्या आॅल इंडिया युनिव्हिर्सटी चॅम्पियन स्पर्धेत अंतिम सामन्यात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

नांदूरवैद्य -: इगतपुरी तालुक्यातील साकुर फाटा येथील गुरु हनुमान कुस्ती आखाड्यात कुस्तीचे धडे गिरवणारा ञ्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध कुस्तीपटू बाळू बोडके याने हरियाणा येथील किवाणी येथे झालेल्या आॅल इंडिया युनिव्हिर्सटी चॅम्पियन स्पर्धेत अंतिम सामन्यात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. व्यंकटराव हिरे पंचवटी महाविद्यालयाचे नेतृत्व केलेल्या बाळू बोडके याने नाशिक जिल्ह्याचे नाव देशभर झळकवले असून पन्नास वर्षांच्या इतिहासात प्रथमच आॅल इंडिया युनिव्हिर्सटी चॅम्पियन स्पर्धेत अशी कामिगरी करणारा तो पहिलाच कुस्तीपटू ठरला आहे.आपल्या वडिलांकडून कुस्तीचे बाळकडू मिळालेल्या बाळूने महाराष्ट्र चॅम्पियन, महाराष्ट्र केसरीत ७० किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले असून तसेच विविध स्पर्धामधून त्याने नेत्रदीपक कामगिरी करत यश संपादन केले आहे. विना मॅटचा सराव करणारा बाळू बोडके सुवर्णपदकाचा मानकरी झाला असून जर आखाड्यातील कुस्तीपटूंना पुर्ण मॅटवर सराव करण्यास मिळाले तर भविष्यात असे अनेक प्रतिभावान आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाल्यानंतर भारताचे नेतृत्व आमच्या गुरु हनुमान कुस्ती आखाड्यातील खेळाडू करतील यात शंकाच नाही असे मत यावेळी गुरु हनुमान आखाड्याचे वस्ताद व प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू ज्ञानेश्वर शिंदे यांनी मांडले.त्यास कृष्णा पाटील, उप महाराष्ट्र केसरी समाधान पाटील,गुरु हनुमान आखाड्याचे वस्ताद व प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्ञानेश्वर शिंदे, प्रशिक्षक प्रवीण सुर्यवंशी,भरवीरचे सरपंच दत्तू जुंद्रे पाटील, चंद्रभान शिंदे, प्रसिद्ध कुस्तीपटू संदिप गायकर, युवराज उगले, आनंदा सामोरे, तुकाराम सहाणे, ज्ञानेश्वर सहाणे, विष्णू सहाणे आदींचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Nashikनाशिक