शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:26 IST

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच अनेक सामाजिक संस्था-संघटनातर्फेदेखील प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देप्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा : शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम

नाशिक : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच अनेक सामाजिक संस्था-संघटनातर्फेदेखील प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.लिटिल हॅण्ड्स स्कूल येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी सभागृह नेता दिलीप दातीर, सामाजिक कार्यकर्ते विजय मेदगे, पंकज खैरनार, ज्ञानेश्वर बगळे, विनोद घरटे, प्रा. राज पवार, ज्ञानेश्वर पवार, मुख्याध्यापक किरण पवार आदी उपस्थित होते.प्रौढ नागरिक मित्रमंडळडिसूझा कॉलनीतील प्रौढ नागरिक मित्रमंडळाच्या प्रांगणात मंडळाचे अध्यक्ष अनंत साळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ज्येष्ठ गायक कलावंत कल्पना कुंवर नूतन काळे, शोभना अहेर, सुनीता मदन, मंगला पोद्दार, शकुंतला कुंवर, नूतन काळे, शकुंतला सूर्यवंशी आदी कलाकारांनी बलसागर भारत होवो हे गीत सादर केले. संगीत संयोजन चारुदत्त दीक्षित व मृदुला पिंगळे यांचे होते. याप्रसंगी माधवराव गोसावी, मार्तंडराव पिंगळे, प्रा. प्रदीप देवी, विजया पंडित, अरविंद कोरान्ने, आप्पासाहेब मुळे, आदि उपस्थित होते. वैशाली देवळे यांनी सूत्रसंचालन केले.संत ज्ञानेश्वर मंडळसंत ज्ञानेश्वर सांस्कृतिक मंडळ संचलित अभ्यासिका येथे संस्थेचे सदस्य वसंतराव लोखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कृष्णा गांगुर्डे लेखापरीक्षक यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्थेचे सरचिटणीस भास्करराव तानपाठक यांनी सूत्रसंचालन केले. तसेच अभ्यासिकेतील विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब सानप, नगरसेवक मच्छिंद्र सानप, संस्थेचे सदस्य सुभाषचंद्र अग्रवाल, राजेश शेळके, विजय खाचणे, देवीदास सावळे, सुरेंद्र टाटीया, कैलास आंबेडकर, विजय फड, गणेश सानप, तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.माजी सैनिकांना सातपूर गौरव पुरस्कार प्रदानप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत सातपूर कॉलनीतील आरंभ ग्रुप, नीलधारा सोशल फाउंडेशन, जेसीआय नाशिक न्यू गोदावरी व रत्नकन्या सेवाभावी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने देशासाठी प्राणपणाला लावणाऱ्या माजी सैनिकांना सातपूर गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सातपूर कॉलनीतील महापालिकेच्या जिजामाता शाळेत आयोजित या कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक सलिम शेख होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका इंदूबाई नागरे, दीक्षा लोंढे, सातपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मजगर, रामहरी संभेराव, केंद्रप्रमुख नितीन देशमुख, रत्नकन्या संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण निकम, जेसीआयचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर महाजन आदी उपस्थित होते. प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्र माची सुरु वात करण्यात आली. जेसीआयचे अध्यक्ष लोकेश कटारिया यांनी मनोगत व्यक्त केले. नाशिकमधील ४० माजी सैनिक तसेच सातपूर विभागात विविध सामाजिक उपक्र म राबविणाºया ३० सामाजिक संस्था आणि मंडळांना सातपूर गौरव पुरस्कार देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक संदीप भोजणे यांनी केले. सूत्रसंचालन लोकेश कटारिया यांनी केले. सुरेश खांडबहाले यांनी आभार मानले. यावेळी बाळासाहेब पोरजे, किरण बद्दर, पराग कुलकर्णी, सुनील मराठे, चंद्रभान मालुंजकर, एजाज शेख, हर्षल ढाके, अमित पाटील, स्वप्नील देसाई, पलाश गुरसाळे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकRepublic Dayप्रजासत्ताक दिन