शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाल शिवकथाकार स्वराने जिंकली मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 14:34 IST

आपल्या कडक आवाजात शिवरायांच्या कार्याचा इतिहास सांगणाऱ्या नागपूरच्या बाल शिवकथाकार स्वरा ठेंगडी हिने उपस्थित शिवप्रेमींची मने जिंकली.

ठळक मुद्देबाल शिवकथाकार स्वरा ठेंगडी हिने उपस्थित शिवप्रेमींची मने जिंकली. शिखर स्वामीनी महिला मंडळातर्फे व्याख्यान शिवरायांच्या क्लुप्त्या, गनिमी कावा, जिवलग सहकारी मावळे यांचे वर्णन

नाशिक : शिवरायांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र..., शिवजन्म...,शिवरायांचे बालपण..., परकीय सत्तेचे प्रजेवर होणारा अन्याय - अत्याचार...,स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा..., तोरणेवरील चढाई....असा टप्प्या टप्प्याने आपल्या कडक आवाजात शिवरायांच्या कार्याचा इतिहास सांगणाऱ्या नागपूरच्या बाल शिवकथाकार स्वरा ठेंगडी हिने उपस्थित शिवप्रेमींची मने जिंकली.         शिखर स्वामीनी महिला मंडळातर्फे ऋतुरंग भवनात नागपूरची बाल शिव कथाकार स्वरा ठेंगडी हिचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यानाचे उद्घाटन आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिखर स्वामीनी महिला मंडळ अध्यक्षा आणि आयोजक नगरसेविका संगीता गायकवाड , नगरसेवक रमेश धोंगडे, डॉ विजय कºहाडे, योगेश भगत, प्रभाकर ठेंगडी, राजेश फोकणे, नितीन चिडे, शिरीष लवटे, हेमंत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.        यावेळी बाल शिव कथाकार स्वरा ठेंगडी हिने फतेहखान, शाईस्तेखान, चंद्रराव मोरे यांच्यासोबतच्या लढाया, रायगडाची निर्मिती, संभाजी महाराज जन्म ,शिवरायांचे थोरले बंधू संभाजी याचा मृत्यू, कल्याण भिवंडी खजिना, आदिलशाहीपुढे निर्माण झालेली संभ्रमावस्था, स्वराज्य स्थापना, विविध किल्ल्यांवरील लढाया, स्वकीयांचा केलेला बंदोबस्त, अफजलखानाचा वध, स्वराज्याभिषेक सोहळा आदी प्रसंग आपल्या दमदार आवाजात अगदी हुबेहूब उभे केले. स्वरा हिने शिवरायांच्या क्लुप्त्या, गनिमी कावा, जिवलग सहकारी मावळे यांचे वर्णन करताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे करत सर्वांना मंत्रमुग्ध केले.

टॅग्स :NashikनाशिकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज