सटाणा : येथील बागलाण एज्युकेशन संस्थेच्या इंग्लीश मेडीयम शाळेच्या वार्षिक क्रि डा स्पर्धांचा समारोप नाशिकचे पहिले आयर्न मॅन अम्मर मियाजी, सटाणा शहराच्या प्रभारी पोलीस अधिकारी सोनाली कदम, सहाय्यक पोलिस निरिक्षक देवेंद्र शिंदे, संस्थेचे अध्यक्ष विश्वास चंद्रात्रे, संचालक राजेंद्र भांगडीया यांच्या उपस्थितीत करण्यात आला.अम्मर मियाजी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्र मास सुरु वात करण्यात आली.याप्रसंगी मियाजी, सोनाली कदम, देवेंद्र शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उपाध्यक्ष नितीन चंद्रात्रे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विवीध क्रि डा प्रकारातील विजेत्या खेळाडुंना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी अम्मर मियाजी यांनी मल्लखांब प्रात्यक्षिके करणारे विद्यार्थी व शिक्षक मधुकर नंदाळे यांना गौरव केला.दोन दिवस चाललेल्या या क्रि डा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक संजय निकम, श्रीमती, जे. पी. गुंजाळ, एन. एस. सोनवणे, क्रि डा शिक्षक गणेश वाघ, एम. के मगर, जी. जी. राठोड, पि. आर. निकम, दत्ता देवरे, विद्यार्थी प्रतिनिधी प्रतिक सोनवणे, विधात्री हेगडे आदींसह सर्व शिक्षक, शिक्षिकांनी परिश्रम घेतले. कार्यक्र माचे सुत्रसंचलन राजेंद्र पवार व हीरे यांनी केले.
बागलाण एज्युकेशन संस्थेच्या क्रि डा स्पर्धांचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 17:43 IST
सटाणा : येथील बागलाण एज्युकेशन संस्थेच्या इंग्लीश मेडीयम शाळेच्या वार्षिक क्रि डा स्पर्धांचा समारोप नाशिकचे पहिले आयर्न मॅन अम्मर मियाजी, सटाणा शहराच्या प्रभारी पोलीस अधिकारी सोनाली कदम, सहाय्यक पोलिस निरिक्षक देवेंद्र शिंदे, संस्थेचे अध्यक्ष विश्वास चंद्रात्रे, संचालक राजेंद्र भांगडीया यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
बागलाण एज्युकेशन संस्थेच्या क्रि डा स्पर्धांचा समारोप
ठळक मुद्देमल्लखांब प्रात्यक्षिके करणारे विद्यार्थी व शिक्षक मधुकर नंदाळे यांना गौरव केला.