शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

१५ समाजकंटकांना ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 00:13 IST

सोशल मीडियाच्या गैरवापरावर ग्रामीण पोलिसांचीदेखील करडी नजर आहे. या माध्यमांतून समाजविघातक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पंधरा संशयितांना ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

ठळक मुद्देसोशल मीडिया रडारवर : ग्रामीण पोलिसांकडून दहा गुन्हे दाखल

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यासह जिल्ह्याच्या भागात संचारबंदीसह साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आलेला आहे. दरम्यान, सोशल मीडियाच्या गैरवापरावर ग्रामीण पोलिसांचीदेखील करडी नजर आहे. या माध्यमांतून समाजविघातक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पंधरा संशयितांना ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ग्रामीण भागात गाव, तालुक्यांच्या ठिकाणी एकूण १० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने केंद्र, राज्य शासनातर्फे संपूर्ण भारतात लॉकडाउन घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्णात संचारबंदी आदेश लागू आहेत. सदर कालावधीमध्ये केवळ अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू, सेवांचा पुरवठा सुरू आहे. या काळात काही समाजविघातक व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह संदेश, साहित्य, चित्रफितीद्वारे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशा अफवा पसरवत असल्याचे अधीक्षक डॉ. आरती सिंंह यांच्या लक्षात आले. कोणतीही खातरजमा न करता चुकीची माहितीवजा बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत होती. यामुळे नाशिक ग्रामीण पोलिसांनी सर्वच तालुक्यांना अलर्ट दिला आहे.नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या हद्दीतील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. सोशल मीडियाद्वारे एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, मेसेंजर व्ट्टिर, टिकटॉक, हॅलो, इन्स्टाग्रामचा केवळ मनोरंजन आणि समाजप्रबोधनासाठी सुयोग्य वापर करावा. दोन समाजात तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह संदेश, साहित्य, चित्रफीत आदी कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाद्वारे प्रसारित केल्यास कारवाईसाठी ते पात्र राहतील, असे सायबर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Policeपोलिसcyber crimeसायबर क्राइम