शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षबागांना जिवाणू करप्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:31 IST

राज्यात येणार येणार म्हणून लांबलेल्या मान्सूनच्या आगमनाचे अखेर संकेत दिसू लागले असून, सर्वत्र ढगाळ वातावरण व गेल्या एक-दोन आठवड्यांत झालेल्या पावसामुळेही रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता असल्याने बळीराजाची शेती व्यवस्थापन करताना कसरत होत आहे.

नाशिक : राज्यात येणार येणार म्हणून लांबलेल्या मान्सूनच्या आगमनाचे अखेर संकेत दिसू लागले असून, सर्वत्र ढगाळ वातावरण व गेल्या एक-दोन आठवड्यांत झालेल्या पावसामुळेही रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता असल्याने बळीराजाची शेती व्यवस्थापन करताना कसरत होत आहे. ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांवर जिवाणू करप्याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी या काळात खास काळजी घेण्याची गरज असल्याचा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे. तर कांदा उत्पादक शेतकºयांसमोर पावसापासून कांदा वाचविण्याचे संकट उभे असतानाच वादळी पाऊस आणि गारपिटीपासून फळभाज्या व पालेभाज्या वाचविण्यासाठीही शेतकºयांना कसरत करावी लागत आहे.  जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीत कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाल्याने शेतकºयांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले असताना जूनच्या उत्तरार्धात ढगाळ हवामान आणि वादळी वाºयामुळे द्राक्षबागांवर जिवाणू करप्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. मान्सून आगमनाच्या काळात होणाºया गारपिटीमुळे पाने फाटणे, हिरव्या काडीवर जखमा होण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे जिवाणू करपा किंवा मोट्रीओडिप्लोडिया यांसारख्या बुरशा काडीमध्ये वाढण्याची शक्यता असते. द्राक्ष उत्पादक शेतकºयांसमोर अशाप्रकारे करपा नियंत्रणाचे आव्हान असताना कांदा उत्पादक व फळभाज्या, पालेभाज्या उत्पादन शेतकरीही संकटात आहे. मान्सूनचा पाऊस तोंडावर आलेला असताना भाव वाढण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कांदा उत्पादक शेतकºयांना कांदा साठविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. त्याचप्रमाणे मान्सूनच्या आगमनाबरोबरच शेतक ºयांची खरिपाच्या पेरणीसाठी लगबग सुरू होणार आहे. मात्र पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी किमान ८० ते ९० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच शेतकºयांनी पेरणी करण्याचा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे.पावसाच्या अंदाजानुसार पीकपद्धती ठरवाभारतीय हवामानशास्त्र दरवर्षी एप्रिल महिन्यात लांबपल्ल्याचा हवामान अंदाज वर्तवते. त्यानुसार ज्या भागात सरासरीपेक्षा पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे त्या भागात कमी पाण्यावर येणाºया पिकांची निवड करावी. त्यात भुईमूग, सोयाबीन, घेवडा, मूग, मटकी, उडीद, धने तसेच कमी कालावधीचं तुरीचं वाण, बाजरी, ज्वारी, सूर्यफूल, मिरची इत्यादी पिकांच्या निवडीस प्राधान्य देण्याचा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी