शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांच्या शौचालयांना ‘स्वच्छतेचा’ ब्रेक सीईओंनी पाठविला प्रस्ताव परत: आमसभेत मांडणार भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 19:58 IST

नाशिक : समाजकल्याण विभागाच्या वतीने ३ टक्के अपंग निधीतून ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अत्याधुनिक शौचालय उभारण्याच्या प्रस्तावाला मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी ब्रेक लावल्याचे वृत्त आहे. संपूर्ण स्वच्छता विभागाच्या वतीनेही शौचालय मंजूर केले असल्यास समाज कल्याणची शौचालय उभारणी दुबार होऊ नये, यासाठी हा ब्रेक लावण्यात आल्याचे ...

ठळक मुद्देग्रामीण भागातील ३,३८० प्राथमिक शाळांपैकी जवळपास १२० प्राथमिक शाळांमध्ये अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अशी शौचालये नसल्याचे सर्वेक्षणात आढळून आले

नाशिक : समाजकल्याण विभागाच्या वतीने ३ टक्के अपंग निधीतून ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अत्याधुनिक शौचालय उभारण्याच्या प्रस्तावाला मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी ब्रेक लावल्याचे वृत्त आहे. संपूर्ण स्वच्छता विभागाच्या वतीनेही शौचालय मंजूर केले असल्यास समाज कल्याणची शौचालय उभारणी दुबार होऊ नये, यासाठी हा ब्रेक लावण्यात आल्याचे कळते.दरम्यान, येत्या ३ आॅक्टोबरच्या सर्वसाधारण सभेत आपण यासंदर्भात आपली भूमिका मांडू, असा पावित्रा समाज कल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांनी घेतला आहे.समाज कल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांनी ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अत्याधुनिक असे शौचालय उभारण्यासाठी समाज कल्याण विभागाला सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यात ग्रामीण भागातील ३,३८० प्राथमिक शाळांपैकी जवळपास १२० प्राथमिक शाळांमध्ये अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अशी शौचालये नसल्याचे सर्वेक्षणात आढळून आले होते. या १२० प्राथमिक शाळांमध्ये अपंगांसाठी असलेल्या ३ टक्के निधीतून सुमारे १ कोटी ४ लाखांची तरतूद धरण्यात आली आहे. अपंगांचा तीन टक्के निधी गेल्या दोन वर्षांपासून अखर्चित राहत असल्याने तो यावर्षी खर्च व्हावा, यासाठी समाज कल्याण विभागाने विविध योजनांची चाचपणी सुरू केली असून, अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अत्याधुनिक शौचालय उभारणी हा त्याचाच एक भाग आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी स्वच्छता विभागाकडूनही प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शौचालय उभारणी केली जाते काय? असेल तर या योजनेची दुरुक्ती होणार नाही काय? याबाबतची छाननी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश संंबंधित विभागाला दिल्याचे समजते. सभापती सुनीता चारोस्कर यांनी या एक कोटींच्या शौचालय उभारणीसह नवीन इमारतीत लिफ्ट बसविणे, मुलींच्या आश्रमशाळांमध्ये सीसीटीव्ही बसविणे या सर्व योजनांच्या बाबतीत येत्या आमसभेत आपण प्रशासनाला जाब विचारू, असे स्पष्ट केले.