शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अंबिका ओझरच्या शेतकऱ्यांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:51 IST

कळवण : तालुक्यातील देवळी वणी लघु पाटबंधारे प्रकल्पातून रब्बी पिकासाठी तत्काळ आवर्तन मिळावे, या मागणीसाठी अंबिकाओझर येथील आदिवासी शेतकºयांनी लघु पाटबंधारे कळवण कार्यालयासमोर मंगळवारपासून सुरु केलेले बेमुदत उपोषण बुधवारी (दि.६)नायब तहसीलदार डॉ. व्यकंटेश तुप्ते व पाटबंधारे विभागाच्या लेखी आश्वासननंतर उपोषण मागे घेतले.

ठळक मुद्देकळवण तहसील : आवर्तन सोडण्याची मागणी

कळवण : तालुक्यातील देवळी वणी लघु पाटबंधारे प्रकल्पातून रब्बी पिकासाठी तत्काळ आवर्तन मिळावे, या मागणीसाठी अंबिकाओझर येथील आदिवासी शेतकºयांनी लघु पाटबंधारे कळवण कार्यालयासमोर मंगळवारपासून सुरु केलेले बेमुदत उपोषण बुधवारी (दि.६)नायब तहसीलदार डॉ. व्यकंटेश तुप्ते व पाटबंधारे विभागाच्या लेखी आश्वासननंतर उपोषण मागे घेतले.देवळीवणी लघुपाटबंधारे प्रकल्पातून २४ ते २५ जानेवारी दरम्यान रब्बी पिकासाठी आवर्तन सोडले होते. मात्र देवळीवणी व बोरदैवत येथील ग्रामस्थांनी बळजबरीने पाणी बंद केल्याने या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेवटच्या अंबिका ओझर या गावाला पाणी पोचले नाही. त्यामुळे येथील आदिवासी शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित राहिले. आधीच शेतमालाला योग्य दर न मिळाल्याने शेतकरी हताश झाला आहे, रब्बी हंगामासाठी गहू,हरभरा, गावठी कांदा, भाजीपाला या पिकांची लागवड केली असून पिकांना शेवटच्या आवर्तनासाठी पाणी अपुरे पडत असल्यामुळे तत्काळ आवर्तन सोडावे, या मागणीसाठी शेतकºयांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.माकपा तालुका सरचिटणीस हेमंत पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मागणी संदर्भात चर्चा केली आणि महसूल व पाटबंधारे विभागाशी चर्चा घडवून आणली. चर्चा सफल झाल्याने पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता रौंदळ यांनी ११ फेब्रुवारी रोजी पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.यावेळी रामदास खिल्लारी, पोलीस पाटील मन्साराम गांगुर्डे, विक्र म भोये, साहेबराव भोये, एकनाथ भोये, बुधा मांडवी, भाऊसाहेब भोये, परशराम भोये, अविनाश अिहरे, दीपक भोये, बापू भोये, कांशीराम भोये आदींसह शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.