शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

बच्चू कडू यांनी आयुक्तांवर उगारला हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:49 IST

नाशिक : अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अपंगांसाठी राखीव असलेल्या अखर्चित निधीबद्दल जाब विचारत सोमवारी (दि. २४) नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यावर थेट हात उगारला.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आक्रमक शैलीतील आंदोलनाने परिचित असलेले विदर्भातील अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अपंगांसाठी राखीव असलेल्या अखर्चित निधीबद्दल जाब विचारत सोमवारी (दि. २४) नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यावर थेट हात उगारला. यावेळी आयुक्त आणि बच्चू कडू यांच्यात शाब्दिक चकमकही झडली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत बच्चू कडू यांना रोखले.  शिष्टमंडळातील कार्यकर्त्यांनीही गोंधळ घालत घोषणाबाजी केली. दरम्यान, मारहाण करणे व सरकारी कामकाजात अडथळा आणल्याबद्दल महापालिका प्रशासनाने बच्चू कडू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी बच्चू कडू यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. तत्पूर्वी, प्रहार संघटनेच्या वतीने दिव्यांगांनी महापालिका मुख्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करत निषेध केला. नाशिक महापालिकेकडून १९९५ च्या अपंग पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही, अपंगांसाठी अंदाजपत्रकात तीन टक्के राखीव निधीची तरतूद असूनही खर्च केला जात नाही, यांसह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने महापालिकेच्या राजीव गांधी भवनसमोर आंदोलन करण्यात आले. दुपारच्या सुमारास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असलेले आमदार बच्चू कडू यांचे आंदोलनस्थळी आगमन झाले. त्यानंतर कडू यांच्यासह शिष्टमंडळ आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या दालनात चर्चेसाठी गेले. सुरुवातीलाच कडू यांनी, अपंगांसाठी कायदा केला असताना त्याचे पालन केले जात नाही आणि महापालिकेने ३ टक्के राखीव निधी खर्च केला नसल्याबद्दल आयुक्तांना जाब विचारला. यावेळी, आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी, अपंग कल्याण आयुक्तांकडून माहिती मागविली असल्याचे सांगितले. कडू यांनी अपंग आयुक्त कल्याण यांचा त्याच्याशी काय संबंध, असा जाब विचारला असता आयुक्तांनी मनपा आपल्या पद्धतीने खर्च करेल, असे स्पष्टीकरण दिल्याने कडू यांचा तोल घसरला आणि त्यांनी टेबलावर जोरदार हात आपटत आयुक्तांवर हात उगारला. यावेळी सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी कडू यांना रोखले. त्यानंतर, आयुक्त बैठकीतून आपल्या दालनात निघून गेले. आयुक्त चर्चा न करताच निघून गेल्याने शिष्टमंडळातील सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. आयुक्तांनी परत येऊन माफी मागितल्याशिवाय दालन सोडणार नसल्याचाही पवित्रा सदस्यांनी घेतला. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, प्रशासन उपआयुक्त हरिभाऊ फडोळ, शहर अभियंता उत्तम पवार, मुख्य लेखापाल सुभाष भोर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे या अधिकाऱ्यांनी बच्चू कडू यांच्याशी चर्चा करत त्यांच्या विविध मागण्यांची नोंद घेतली. कडू यांच्या या आक्रमकतेमुळे मनपा वर्तुळात खळबळ उडाली. दरम्यान, मारहाण करणे व सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल बच्चू कडू यांच्या विरोधात महापालिका प्रशासन उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार नोंदविली. आयुक्त-कडू यांच्यात सामंजस्याचा प्रयत्नमहापालिका प्रशासनाने आमदार बच्चू कडू यांच्याविरुद्ध कारवाईची तयारी सुरू केल्यानंतर बच्चू कडू यांना पोलिसांनी पुन्हा एकदा आयुक्तांकडे घेऊन जात सामंजस्य घडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी आपण कारवाईवर ठाम असल्याचे सांगितले. कडू यांनी मात्र पत्रकारांशी बोलताना, आपल्या आंदोलनामुळे आयुक्त दुखावल्याचे सांगितले. परंतु, कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर आपण पुन्हा येऊ आणि त्यावेळी न सांगता येऊ, असे सांगत आपल्यातील आक्रमकता कायम असल्याचे दर्शविले. कृष्ण नव्हे कंसआयुक्तांचे नाव कृष्ण आहे, परंतु ते तर कंस निघाले. त्यांना अपंग माणूस बाजूला थांबणे आवडले नाही. त्यांनी कायदा मोडला म्हणून आम्हाला कायदा हातात घ्यावा लागतो. १९९५ पासून अपंग पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी मनपाने केलेली नाही. तीन टक्के निधी खर्च केला नाही. नोंदणी अपूर्ण आहे. अधिकाऱ्यांच्या अंगावर गेले तरच कामे होतात. आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस श्रद्धांजली वाहण्यातच जातो म्हणून मी अपंग बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी नाशिकला आलो. यापुढे अंमलबजावणी झाली नाही तर आणखी हिसका दाखवू.- बच्चू कडू, आमदारपब्लिसिटी स्टंटबच्चू कडू हे चर्चा करण्यासाठी आले, परंतु त्यांनी अवलंबिलेली पद्धत चुकीची होती. तो एक पब्लिसिटी स्टंट होता. प्रशासनाला वेठीस धरून अशा प्रकारांमुळे कामे होत नसतात. मला अपंगांची जास्त काळजी आहे. महापालिकेने अपंगांसाठी आजवर कामे केली आहेत. नियमानुसार त्यांना सवलती दिल्या जात आहेत. कडू यांच्याविरुद्ध सरकारी कामकाजात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा नोंदविण्यात आला आहे.- अभिषेक कृष्ण, आयुक्त, मनपायेथे पडली वादाची ठिणगी!आमदार बच्चू कडू यांच्यासोबत शिष्टमंडळात काही अपंग बांधव-भगिनीही होत्या. दालनात काही अपंगांना बसण्यास जागा नसल्याने ते आयुक्तांच्या पाठीमागे उभे राहिले. आयुक्तांनी या अपंग बांधवांना समोर बसण्यास सांगितले शिवाय, छायाचित्रकारांनी आपल्या परवानगीशिवाय छायाचित्रे घेऊ नये, असेही सांगितले. त्याला कडू यांनी हरकत घेतली आणि तेथून पहिली ठिणगी पडली. त्यानंतर, आयुक्तांनी अपंग कल्याण आयुक्तांमार्फत माहिती मागविल्याचे सांगितल्याने कडू खवळले आणि वातावरण तापत गेले. त्यात कडू यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना असभ्य भाषेत बोलण्यासही सुरुवात केल्याने गोंधळ वाढत केला. त्यात कडू यांनी थेट आयुक्तांवरच हात उगारल्याने वाद पेटला. त्यामुळे आयुक्त तेथून निघून गेले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.