शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘बेचकीत जन्मतो जीव’ मानवकेंद्री धाडसी काव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 01:17 IST

‘बेचकीत जन्मतो जीव’ काव्यसंग्रहातील रचना या समाजातील वास्तविकतेचे धाडसी चित्रण करणाऱ्या असून, सामाजिक भान ठेवून प्रसंगी विद्रोही शब्दांनीही समाजव्यवस्थेवर कोरडे ओढणाºया किशोर पाठक यांनी आपल्या कवितांमधून माणसांचा शोध घेतला असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले.

नाशिक : ‘बेचकीत जन्मतो जीव’ काव्यसंग्रहातील रचना या समाजातील वास्तविकतेचे धाडसी चित्रण करणाऱ्या असून, सामाजिक भान ठेवून प्रसंगी विद्रोही शब्दांनीही समाजव्यवस्थेवर कोरडे ओढणाºया किशोर पाठक यांनी आपल्या कवितांमधून माणसांचा शोध घेतला असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले. परशुराम सायखेडकर नाट्यगृहात शनिवारी (दि.३०) किशोर पाठक यांच्या ‘बेचकीत जन्मतो जीव’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रा. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे व प्रा. गंगाधर अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांंच्यावर कुटुंबात झालेल्या सामाजिक एकतेच्या संस्काराचा ऊहापोह विचारवंतांनी केला. प्रा. कसबे म्हणाले की, माणसाला आपला जन्म आणि मृत्यू त्याच्या हाती नसतो. मात्र जन्म झाल्यानंतर परिस्थितीशी लढत माणुसकी जपण्यासाठी सर्जनशीलता जपण्याचे धाडस पाठक यांच्या कवितेत सापडते. कवि कुसुमाग्रज यांनी जो सामाजिक वारसा कवितांतून मांडला, तो वारसा पाठक चालवित आहेत. ही सामाजिक भूमिका पाठक यांच्या कवितेत स्पष्टपणे जावणत असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले, तर उत्तम कांबळे म्हणाले, पाठक यांच्या विद्रोही कवितांमधून हे धाडस दिसून येते. त्यांच्या कविता भुतकाळात रमणाºया नाहीत. सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले.कवितांचे नाट्य सादरीकरणपुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या प्रारंभी किशोर पाठक यांच्या कवितांचे नाट्य सादरीकरण करण्यात आले. या कलाकृतीचे दिग्दर्शन सचिन शिंदे आणि राहुल गायकवाड यांनी केले असून नाट्य कलाविष्कारातून समाज, जात,धर्म,चळवळी आणि समाजातील नीती-अनितींवर भाष्य करणाºया कवितांच्या नाट्य सादरीकरणातून दामिनी जाधव, आशिष दळवी, प्रथमेश देशपांडे, प्रताप कमोद, साक्षी ढगे,एकता आढाव आदीं कलाकारांनी रसिकांची मने जिंकली.

टॅग्स :Nashikनाशिक