शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

निकवेल परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 1:14 PM

निकवेल :- बागलाण तालुक्यातील निकवेल येथे आठ ते दहा दिवसापासुन बिबट्याने धुमाकूळ घातला असून पाळीव जनावरांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

निकवेल :- बागलाण तालुक्यातील निकवेल येथे आठ ते दहा दिवसापासुन बिबट्याने धुमाकूळ घातला असून पाळीव जनावरांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.गणेश किशन वाघ यांच्या शेतावरील खळयात बांधलेल्या शेळीला बिबटयाने रविवारी रात्री हल्ला करत फस्त केले. तसेच आठ ते दहा दिवसातुन ही चौथी घटना आहे.परिसरात रोज बिबटया येत असुन त्याने आठ दिवसापुर्वी मार्तन्ड सोनवणे यांचा घोडा, दत्तू वाघ व भिला वाघ यांच्याही शेळया फस्त केल्या आहेत. दिवसेदिवस पाळीव जनावरांवर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. निकवेल परिसरातील जोरण, दहिदुले, विंचुरे, किकवारी परिसरात बाजरी, मका निंदणीचे ,नांगरणीचे कामे सुरु असुन बिबट्या परिसरात आढळुन येत असल्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली आहेत.बिबटया गाव परिसरात व शिवारात आढळुन येत असल्याने कुणीही मजुर, सालगडी शेतात कामावर येण्यास घाबरत असुन कामे खोळबंली आहेत.तसेच या महिन्यात १ तारखेपासुन विज वितरण कंपनीने वीजेच्या वेळांमध्ये बदल केला असुन आठवड्यात चार दिवस दिवसा व तीन दिवस रात्री ८ ते पहाटे ६ वाजेपर्यतच वीज राहते. त्यामुळे बिबट्याच्या संचारामुळे शेतकरी बांधव रात्री शेतात पाणी भरण्यास घाबरत आहेत. वनविभागाने निकवेल येथे पिंजरा लावण्याची मागणी निकवेल वन कमिटीचे अध्यक्ष विवेक सोनवणे, उपसरपंच मुरलीधर वाघ, सोसायटीचे माजी अध्यक्ष निलेश वाघ, पोलिस पाटील विशाल वाघ,भिला वाघ,निलेश खरे,रामराव अनारे,रमेश वाघ,राजेन्द्र महाजन,सुनिल वाघ ,निलेश अनारे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक