शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

'बाबरी' स्मृतिदिन : केवळ मशिदींमध्ये ‘अजान’ पठणाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 14:36 IST

शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनीदेखील बुधवारी (दि.५) सकाळी सर्व मशिदींमध्ये निवेदन पाठवून रस्त्यांवर कुठल्याहीप्रकारचा कार्यक्रम केला जाऊ नये, असे आवाहन केले आहे. पारंपरिक पध्दतीने केवळ मशिदींमध्येच दुपारी तीनवेळा अजान पठण केली जावी, असे पत्रकात म्हटले आहे.

ठळक मुद्देबडी दर्गाच्या प्रारंगणात एकात्मतेसाठी दुवा अखिल भारतीय बाबरी मशिद कृती समितीडून विनंती

नाशिक : बाबरी मशिदीच्या स्मृतिदिनानिमित्त गुरूवारी (दि.६) जुने नाशिक, वडाळागाव, नाशिकरोड आदि भागांमध्ये कोठेही रस्त्यांवर उतरून किंवा एखाद्या चौकात एकत्र येऊन दुपारच्या सुमारास ‘अजान’ पुकारण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. तसेच शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनीदेखील बुधवारी (दि.५) सकाळी सर्व मशिदींमध्ये निवेदन पाठवून रस्त्यांवर कुठल्याहीप्रकारचा कार्यक्रम केला जाऊ नये, असे आवाहन केले आहे. पारंपरिक पध्दतीने केवळ मशिदींमध्येच दुपारी तीनवेळा अजान पठण केली जावी, असे पत्रकात म्हटले आहे.अखिल भारतीय बाबरी मशिद कृती समिती व मुस्लीम पर्सनल लॉकडून करण्यात आलेल्या विनंतीनुसार मालेगावमधील २६ ठिकाणी होणारा सामुहिक अजान पठणाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जुनेनाशिकमध्ये देखील खतीब यांनी याबाबत निर्णय घेत कुठल्याही भागामध्ये रस्त्यांवर कोणतीही संघटना व युवकांचे मंडळांनी येऊन कुठलाही धार्मिक कार्यक्रम करु नये, असे स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यांच्या सुचनापत्रकांचे वाचन बुधवारी दुपारी सर्व मशिदींमधून धर्मगुरूंकडून करण्यात आले. तसेच संध्याकाळी व रात्रीदेखील नमाजपठणाप्रसंगी पत्रकाचे जाहीर वाचन केले जाणार असल्याचे खतीब म्हणाले. शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखून सामाजिक सलोखा व एकात्मतेचा संदेश देण्यासाठी सामुहिकरित्या विशेष दुवा बडी दर्गाच्या प्रारंगणात होणार आहे. यासाठी भद्रकाली पोलीस ठाण्याकडून रितसर परवानगी देण्यात आल्याची माहिती नुरी अकादमीचे हाजी वसीम पिरजादा, एजाज रजा मकरानी यांनी दिली. जुने नाशिकमधील विविध मुस्लीम धार्मिक संघटना, मित्र मंडळांनी या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. स्वतंत्रपणे आपआपल्या भागापुरता कुठलाही कार्यक्रम रस्त्यांवर करु नये, अशी सूचना सहायक आयुक्त आर.आर.पाटील यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत केले आहे. या बैठकीत केवळ मशिदींमध्ये अजान, कुराणपठण, फातिहापठणाचा कार्यक्रम करण्यात येणार असल्याचा निर्णय एकमताने घेतला गेला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरिक्षक मंगलसिंह सुर्यवंशी, हिसामुद्दीन खतीब, हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी, अशोक पंजाबी यांच्यासह आदि सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :MosqueमशिदMuslimमुस्लीमnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय