शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

सुरक्षेची ऐशीतैशी : वैद्यकीय व्यावसायिक संघटित; हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनची स्थापना मनपा रुग्णालयांसाठी सोयीचे निकष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:12 IST

नाशिक : सुरक्षिततेच्या कारणावरून खासगी वैद्यकियांना नाना कारणांवरून वेठीस धरले जात असल्याची तक्रार असताना, महापालिकेच्या आणि अन्य शासकीय रुग्णालयांमध्ये अग्निशमन सुरक्षेच्या उपाययोजना मात्र करण्यात आलेल्या नाहीत.

ठळक मुद्देउपाययोजना मात्र करण्यात आलेल्या नाहीरजिस्ट्रेशन नसेल तर त्यावरून वाद

नाशिक : सुरक्षिततेच्या कारणावरून खासगी वैद्यकियांना नाना कारणांवरून वेठीस धरले जात असल्याची तक्रार असताना, महापालिकेच्या आणि अन्य शासकीय रुग्णालयांमध्ये अग्निशमन सुरक्षेच्या उपाययोजना मात्र करण्यात आलेल्या नाहीत. खासगी रुग्णालयात जाणाºया रुग्णांचा जीव महत्त्वाचा; मग महापालिकेच्या रुग्णालयात जाणाºया रुग्णांच्या आयुष्याचे मोल नाही काय, असा थेट प्रश्न वैद्यकीय व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे.महापालिकेकडे वारंवार जाऊनही प्रशासन पूर्वलक्षी पद्धतीने कायद्याची करीत असलेली अंमलबजावणी, हार्डशिपच्या नावाखाली लाखो रुपयांच्या दिलेल्या नोटिसा आणि अग्निसुरक्षेच्या जाचक अटींविरुद्ध शहरातील हॉस्पिटलचे संचालक एकवटले असून, त्यांनी सर्व चिकित्सा प्रणालीच्या व्यावसायिकांची संघटना स्थापन केली आहे. विधायक मार्गाने प्रयत्न झाले नाहीच तर मग वैधानिक मार्गाने जाण्याची तयारी या व्यावसायिकांनी केली आहे. पाच वर्षांपासून महापालिका शहरातील सर्व रुग्णालयांना अग्निसुरक्षा उपाययोजना करण्यासाठी सक्ती करीत असून, त्यासाठी लाखो रुपयांच्या हार्डशिप बरोबरच अग्निप्रतिबंधक उपाययोजनांसाठी देखील खर्च करावा लागत आहे. त्यामुळे अनेकदा प्रत्यक्ष अधिकाºयांना भेटून आणि लोकप्रतिनिधींमार्फत प्रश्न मांडूनही उपाय होत नसल्याने संबंधित अखेरीस मेटाकुटीस आले आहेत. कोलकाता येथे एका रुग्णालयाला आग लागल्याने नाशिकमधील सर्व रुग्णालये धोकादायक असल्याच्या आविर्भावात कार्यवाही करणारी नाशिक महापालिका आपल्या मालकीच्या आणि अन्य शासकीय रुग्णालयांबाबत अशी भूमिका का घेत नाही, असा प्रश्न निर्माण केला जात आहे. नाशिक शहरात महापालिकेचे बिटको रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय, जिजामाता प्रसूतिगृह, मायको रुग्णालय, मोरवाडी येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालय तसेच अन्य अनेक रुग्णालये आणि प्रसूतिगृह आहेत. परंतु तेथे पाच वर्षांत कोणत्या अग्निसुरक्षा व्यवस्था करण्यात आल्या? जिल्हा शासकीय रुग्णालयात शहर आणि जिल्हाच नव्हे, तर उत्तर महाराष्टÑ तसेच जव्हार, मोखाडा येथूनही हजारो रुग्ण येत असतात. खासगी रुग्णालयांपेक्षा कैक पटीने अधिक रुग्ण महापालिकेच्या बिटको तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात येत असतात. मग मनपाच्या रुग्णालयात अग्निसुरक्षा का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महापालिकेच्या वतीने खासगी रुग्णालयांना देण्यात आलेल्या सवलतीदेखील सापेक्ष असून, त्याचा लाभ मिळेलच असे नाही. दुसरीकडे नगररचना विभागाने साडेतीनशे रुग्णालयांच्या फाईली तयार केल्या असून, लाखो रुपयांच्या हार्डशिप आकारण्याच्या फाईली तयार केल्या असल्या तरी हार्डशिपची रक्कमच प्रचंड असल्याने त्या भरून नियमित करणे शक्य होत नाही. शहरातील काही मोठ्या रुग्णालयांमध्ये हृदयरोग, मूत्रपिंड, मेंदूविकार तसेच अन्य शस्त्रक्रिया होतात. अशा रुग्णालयांमध्ये येणाºया रुग्णांचे मेडिक्लेमदेखील असतात. महापालिकेकडे रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन नसेल तर त्यावरून वाद होतात. त्यामुळे अशा काही निवडक मोठ्या रुग्णालयांनीच महापालिकेकडे हार्डशिपची रक्कम भरून मंजुरीमिळवली आहे. परंतु त्या किंवा अन्य उपाययोजना करून रजिस्ट्रेशन मिळवणाºयांची संख्या अवघी २७ असल्याचे समजते.दीडेक हजारांपैकी २७ रुग्णालयांनी हार्डशिपची रक्कम भरणे हे प्रमाण खूपच अल्प आहे. त्यामुळे आता एकूणच त्रस्त झालेल्या आधुनिक वैद्यकशास्त्र (अ‍ॅलोपॅथी), आयुर्वेद, होमिओपॅथी अशा विविध चिकित्सा प्रणालीच्या रुग्णालयाच्या संचालकांनी एकत्र येऊन नवीन संघटना तयार केली आहे. प्रश्न सुटत नसल्यास न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू असल्याचे समजते.