शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त द्राक्ष बागांवर कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 01:00 IST

शिरवाडे वणी : अवकाळी पाऊस, गारपीट, फयान रोगामुळे रोगग्रस्त झालेल्या द्राक्षबागा नुकसानग्रस्त झाल्याने द्राक्ष बागांवर संतप्त उत्पादकांनी कुऱ्हाडीचे घाव घातले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये संताप : निफाड तालुक्याला गारपिटीचा सर्वाधिक फटका

शिरवाडे वणी : अवकाळी पाऊस, गारपीट, फयान रोगामुळे रोगग्रस्त झालेल्या द्राक्षबागा नुकसानग्रस्त झाल्याने द्राक्ष बागांवर संतप्त उत्पादकांनी कुऱ्हाडीचे घाव घातले.

निफाड तालुका द्राक्ष उत्पादनात अग्रेसर मानला जात असून, द्राक्षाच्या प्रगत शेतीमुळे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया समजला जात होता. द्राक्षाचे पीक हे प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जात होते. तसेच परकीय चलन मिळवून देणारे एकमेव पीक मानले जात असत.

मागील चाळीस वर्षांच्या कालखंडाकडे दृष्टिक्षेप टाकला असता द्राक्ष वेलींची वयोमर्यादा किमान पंचवीस ते तीस वर्षापर्यंत राहात होती .परंतु नवनवीन तंत्रज्ञानानुसार द्राक्षांच्या वेगवेगळ्या जाती द्राक्ष उत्पादकांना दिवसेंदिवस मोहात पाडत आहेत व प्रति पाच वर्षांनंतर बाजारात द्राक्षाच्या विविध वाणांची लागवड करण्यासाठी द्राक्ष उत्पादकांना अपेक्षा पोटी थोड्या कालावधीतच द्राक्ष बागा काढून त्या ठिकाणी नवीन द्राक्ष बागेची लागवड करण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून द्राक्ष वेलींना अवकाळी पावसाचे व गारपीट फयान वादळी वारे यांचा फटका बसत आहे.रोगांचा प्रादुर्भावविविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे परिणामी रोगामुळे द्राक्ष वेली मजबूत होण्याऐवजी कमकुवत होत चालल्या आहेत. त्यामुळे वीस वर्षांपर्यंत वयोमर्यादा असलेल्या द्राक्ष बागेला आता सात ते आठ वर्षांनंतरच कुर्‍हाडीचे घाव सोसण्यास तयार व्हावे लागत आहे. मागील दोन वर्षात पावसाळी वातावरणात छाटलेल्या द्राक्ष बागांवर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला. यामुळे औषधांच्या अनाठाई वापरामुळे निकृष्ट दर्जाच्या होऊन गेल्या.बागा वाचविण्यासाठी महागड्या औषधांची फवारणीद्राक्ष बागा वाचविण्यासाठी भरमसाठ औषधांचा खर्च करूनही अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्यामुळे द्राक्ष वेलींवर रोगांचे प्रमाण वाढून अशक्त झाल्यामुळे द्राक्ष उत्पादकांना अशा द्राक्ष वेलींवर कुऱ्हाड घालण्याची वेळ आली आहे. एकावेळी लावलेली द्राक्ष बाग किमान वीस वर्ष टिकण्यायोग्य असताना पाच ते सात वर्षात द्राक्षवेली समूळ काढून नवीन द्राक्ष बाग तयार करण्यासाठी पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागत आहे.उत्पादन कमी अन‌् खर्चात वाढनवीन द्राक्ष बागेपासून उत्पादन घेण्यासाठी किमान दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागत असून, खर्चही मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. परंतु अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे रोगग्रस्त झालेल्या द्राक्ष बागांपासून मिळणारे उत्पादन कमी मिळत असून, खर्च तेवढाच करावा लागत असल्यामुळे खर्च वजा जाता शिल्लक पुरेपूर होत नसल्यामुळे नाईलाजास्तव अशा द्राक्षबागा समूळ नष्ट करून नवीन लागवड करणेच योग्य असल्याचे द्राक्ष उत्पादकांकडून ऐकावयास मिळत आहे.(०१ शिरवाडे वणी)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी