नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या भीतीमुळे ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत असून शासनाकडून विविध उपाययोजना अंमलात आणल्या जात असतांना घोटी येथील कळसूबाई मित्र मंडळाच्या वतीने चित्रकार दिपक बेलेकर यांनी भंडारदरा चौकामध्ये जैन मंदिरासमोर कोरोनाचे विशाल महाकाय चित्र रांगोळीच्या माध्यमातून रेखाटत अनोखी जनजागृती केली आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन झाल्यामुळे बाहेर पडू नये यासाठी शासनस्तरावरून जनजागृती करण्यात येत असून याच पाशर््वभूमीवर अनेक उपाययोजना अंमलात आणल्या जात असून ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वेगवेगळे उपक्र म देखील राबवत असल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे. अशा परिस्थितीत घोटी कळसूबाई मित्र मंडळाच्या वतीने घोटी येथील या चौकामध्ये अनेक दूकाने असून अत्यावश्यक सेवेसाठी नागरिक या ठिकाणी नेहमीच गर्दी करत असतात. तसेच अनेक नागरीक आपल्या अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडत असल्यामुळे या प्रसिद्ध असलेल्या भंडारदरा चौकातील जैन मंदिरासमोर महाकाय रांगोळीत लिहिलेला संदेश येणाऱ्या व जाणाºया व्यक्तीºया नजरेसआहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, ‘बाहेर पडला त्याला कोरोना नडला’ असे संदेशाद्वारे या कलाकाराने जनजागृतीचे काम केले आहे. या उपक्रमामध्ये मंडळाचे अध्यक्ष भागीरथ मराडे, पोलीस उपनिरीक्षक विलास घिसाडी, हवालदार कृष्णा कोकाटे, वाहतूक हवालदार रामकृष्ण लहामटे,चित्रकार बेलेकर, गजानन चव्हाण, मुख्याध्यापक ऋषीकेश शेळके, सुनील कोते, गिर्यारोहक भाऊसाहेब जोशी आदींनी सहभाग नोंदवला होता.(फोटो १९ रांगोळी, १)घोटी येथील कळसूबाई मित्र मंडळाच्या वतीने कोरोनासंदर्भात जनजागृती करण्यासाठी भंडारदरा चौकात महाकाय रांगोळीद्वारे जनजागृती करण्यात आली त्याप्रसंगीभागीरथ मराडे, दिपक बेलेकर, गजानन चव्हाण, ॠषिकेश शेळके व इतर.
कळसूबाई मित्र मंडळाकडून रांगोळीद्वारे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 15:05 IST
नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या भीतीमुळे ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत असून शासनाकडून विविध उपाययोजना अंमलात आणल्या जात असतांना घोटी येथील कळसूबाई मित्र मंडळाच्या वतीने चित्रकार दिपक बेलेकर यांनी भंडारदरा चौकामध्ये जैन मंदिरासमोर कोरोनाचे विशाल महाकाय चित्र रांगोळीच्या माध्यमातून रेखाटत अनोखी जनजागृती केली आहे.
कळसूबाई मित्र मंडळाकडून रांगोळीद्वारे जनजागृती
ठळक मुद्देसोशल डिस्टिन्संग : ‘कोरोनासंदर्भात बाहेर पडला त्याला कोरोना नडला’ अनोखी उपक्रम