शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

दरेगावी दुचाकीवरून केली जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 00:02 IST

चांदवड तालुक्यातील ग्रामीण भागात चोऱ्या व घरफोड्यांचे प्रमाण वाढत आहे. जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लॉकडाउनमुळे पोलीस यंत्रणा बंदोबस्तात अडकली आहे. ग्रामीण भागातील गस्ती सध्या बंद आहे. अशा परिस्थितीत पोलीसपाटील व ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्य व नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देत असल्याचे चित्र पहावयाला मिळत आहे.

ठळक मुद्देसतर्कता : घरफोड्यांना आळा घालण्यासाठी पोलीसपाटलाचा उपक्रम

दरेगाव : चांदवड तालुक्यातील ग्रामीण भागात चोऱ्या व घरफोड्यांचे प्रमाण वाढत आहे. जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लॉकडाउनमुळे पोलीस यंत्रणा बंदोबस्तात अडकली आहे. ग्रामीण भागातील गस्ती सध्या बंद आहे.अशा परिस्थितीत पोलीसपाटील व ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्य व नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देत असल्याचे चित्र पहावयाला मिळत आहे. गेल्या २२ मार्चपासून देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू आहे. सर्वच उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. या परिस्थितीत चोरटे सक्रिय झाले आहे. शहरामध्ये पुरेसा पोलीस बंदोबस्त असल्याने चोरटे ग्रामीण भागात लक्ष करीत आहेत.तालुक्यातील पूर्व भागातील शिंगवे, रायपूर, निंबाळे, साळसाने, वडगाव पंगू, भडाणे या परिसरात घरफोड्या व लुटमारीचे प्रकार घडत आहेत. अशी पोस्ट सोशल मीडियाद्वारे फिरत आहे. चोरीचे वाढते प्रकार लक्षात घेता तालुक्यातील पोलीसपाटील व ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य जनतेला वाड्यावस्त्यांवर जाऊन सतर्क राहण्याच्या सूचना करत आहे. रात्री-बेरात्री कुणी अनोळखी इसम आढळून आल्यास त्याची त्वरित माहिती द्यावे, असे आवाहन केले जात आहे. शेतामध्ये वास्तव्य करणाºया नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी असा सल्ला दिला जात आहे. ग्रामसक्षक दलाचे जवान सदस्य आपल्या गाव परिसरात दररोज ग्रस्त घालत आहेत. पोलिसांनी रात्रीची गस्त घालवावी, अशी मागणी केली जात आहे.घरफोडी व चोरीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी दरेगावचे पोलीसपाटील सोमनाथ गांगुर्डे व ग्रामपंचायत कर्मचारी उत्तम खरात यांनी जनजागृती सुरू केली आहे. गावालगतच्या वाड्यावस्त्यांवर दुचाकीवरून फिरत ध्वनिक्षेपकाव्दारे संवाद साधत आहे. नागरिकांनी आपले भ्रमणध्वनी बंद ठेवू नये. संकटकाळात एकमेकाच्या संपर्कात राहावे, असे आवाहन केले जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य