शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला संचलनातून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 23:55 IST

२१ दिवसांच्या लॉकडाउन नंतर केंद्र व राज्य शासनाने पुन्हा ३० एप्रिल पर्यंत लॉकडाउन वाढविल्यामुळे सिन्नर शहरातील नागरिकांना कोरोना बाबत जनजागृती करण्यासाठी प्रांताधिकारी अर्चना पठारे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर तहसील प्रशासन, सिन्नर नगर परिषद, सिन्नर पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातून संचालन करण्यात आले.

ठळक मुद्देफलकांद्वारे संदेश : रॅलीतील अधिकाऱ्यांवर नागरिकांकडून फुलांचा वर्षाव

सिन्नर : २१ दिवसांच्या लॉकडाउन नंतर केंद्र व राज्य शासनाने पुन्हा ३० एप्रिल पर्यंत लॉकडाउन वाढविल्यामुळे सिन्नर शहरातील नागरिकांना कोरोना बाबत जनजागृती करण्यासाठी प्रांताधिकारी अर्चना पठारे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर तहसील प्रशासन, सिन्नर नगर परिषद, सिन्नर पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातून संचालन करण्यात आले.यावेळी घरीच राहा, सुरक्षित राहा, एकजूटचे दाखवू बळ, कोरोना काढेल पळ, कोरोना हारेल, देश जिंकेल, आया है कोरोना इससे मत डरना, पोलिसांना सहकार्य करा, पोलीस आहेत मित्र, करोनाशी लढू एकत्र, गो करोना गो, अशा घोषणा देत जनजागृती करण्यात आली.सिन्नर नगर परिषद येथील हुतात्मा चौक येथून संचालनास प्रारंभ झाला. गंगावेस, राजे फतेसिंग मार्ग, वावी वेस, छत्रपती शिवाजी चौक, तानाजी चौक, क्रांती चौक, काजीपुरा, पडकी वेस, महात्मा फुले पुतळा, नेहरू चौक, नाशिक वेस, लाल चौक येथून सिन्नर नगर परिषद कार्यालय जवळील हुतात्मा स्मारक येथे रॅलीची राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.सर्वांच्या सेवेला सलाम करत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन बचत गटातील महिलांद्वारे रांगोळी काढून मानवंदना देण्यात आली तर छत्रपती शिवाजी चौक येथे रॅलीतील सहभागी सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला.यावेळी विभागीय प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे, नगराध्यक्ष किरण डगळे, मुख्याधिकारी संजय केदार, पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर रॅलीची आयोजन करण्यात आलेहोते.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन बच्छाव, सिन्नर नगरपरिषद वैद्यकीय अधिकारी, डॉ. प्रशांत खैरनार, डॉ. निर्मला गायकवाड, बांधकाम अभियंता सुरेश गवांदे, नितीन परदेशी, रवींद्र देशमुख, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव आदींसह आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी, यांनी सहभाग घेतला होता.सिन्नर शहरातील नागरिकांना कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रांताधिकारी अर्चना पठारे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर तहसील प्रशासन, सिन्नर नगर परिषद, सिन्नर पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातून संचालन करण्यात आले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस