शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

शिस्तबद्ध वाहन रॅलीने मोर्चाविषयी जागृती

By admin | Updated: September 22, 2016 01:43 IST

शिस्तबद्ध वाहन रॅलीने मोर्चाविषयी जागृती

पाथर्डी फाटा : शनिवारी निघणाऱ्या भव्य मराठा क्रांती मूक मोर्चाच्या जागृतीसाठी पाथर्डी पंचक्रोशीतील युवकांनी परिसरातील गावांमध्ये मोटारसायकल रॅली काढून वातावरण निर्मिती केली. बुधवारी सकाळी पाथर्डी गावातून निघालेली रॅली सुमारे पंचवीस गावांमधून नेण्यात येऊन दुपारी पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून समाप्त झाली. शनिवारी (दि. २४) नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाचा मोर्चा विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निघणार आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी विविध बैठका व विचार विनिमय, पोस्टर्स, बॅनर्स, स्टिकर्स यांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. नाशिक शहराच्या आजूबाजूच्या गावांमध्येही मोर्चाची जागृती व वातावरणनिर्मिती होण्यासाठी पाथर्डी पंचक्रोशीतील तरुणांनी दुचाकी रॅली काढली. पाथर्डी येथील हनुमान मंदिर चौकात एका युवतीच्या हस्ते श्रीफळ वाढवून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. तत्पूर्वी रॅलीमार्गात हॉर्न न वाजविणे, आपली दुचाकी पुढे दामटण्याचा प्रयत्न न करणे, घोषणा न देणे, शिस्त पाळणे आदि महत्त्वाच्या सूचना समाजातील मान्यवरांनी युवकांना दिल्या. सर्व दुचाकींना भगवे ध्वज लावण्यात आले होते. रॅलीच्या अग्रभागी युवतींनीही सहभागी होत भगवे ध्वज हाती घेतले होते. यावेळी अस्मिता देशमाने, नगरसेवक सुदाम कोंबडे, एकनाथ नवले, संजय डेमसे, संजय गायकवाड, शरद निकम, विजय डेमसे, विश्वनाथ धोंगडे, मदन डेमसे, माणिक मेमाणे, तानाजी गवळी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)