शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

राजापूरचे साजिद सय्यद सेना मेडलने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 20:16 IST

राजापूर : येथील रहिवासी व सध्या जम्मू काश्मीर येथे सेवेत असलेल्या साजिद इब्राहिम सय्यद या सैनिकाने जम्मू काश्मीर येथे भारतीय सैन्यावर गोळीबार करणाऱ्या दोन आतंकवाद्यांना कंठस्नान घातल्याबद्दल सैन्य दलाकडून त्यांना सेना मेडलने सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देदोन आतंकवादी ठार : बहादुरीबद्दल गौरव

राजापूर : येथील रहिवासी व सध्या जम्मू काश्मीर येथे सेवेत असलेल्या साजिद इब्राहिम सय्यद या सैनिकाने जम्मू काश्मीर येथे भारतीय सैन्यावर गोळीबार करणाऱ्या दोन आतंकवाद्यांना कंठस्नान घातल्याबद्दल सैन्य दलाकडून त्यांना सेना मेडलने सन्मानित करण्यात आले.जम्मू काश्मीर येथे राजपूत रेजिमेंट्सच्या ४४ बटालियन राष्ट्रीय रायफल्समध्ये येवला तालुक्यातील राजापूर येथील जवान साजिद सय्यद कार्यरत आहेत. २२ जानेवारी २०१९ रोजी जम्मू काश्मीरमधील एका गावात आतंकवादी लपले असल्याची गुप्त वार्ता मिळाल्यानंतर साजिद सय्यद यांची टीम त्या गुप्त ठिकाणाजवळ पोहोचली.

भारतीय सैन्य आल्याची चाहूल लागताच आतंकवाद्यांनी भारतीय सैनिकांवर गोळीबार सुरू केला. सय्यद यांच्या टीमने जोरदार प्रत्युत्तर देत आतंकवाद्यांना ते ठिकाण सोडून जाण्यास भाग पाडले. त्यातील एक आतंकवादी पळून जात असताना साजिदने त्यास टिपले. दुसराही जोरदार गोळीबार करीत पळत असताना जीवाची पर्वा न करता साजिद सय्यद यांनी त्याचा पाठलाग करून त्यालाही ठार केले.

जम्मू काश्मीर येथे उत्कृष्ट कामगिरी बजावत बुद्धी तत्परता, प्रेरणादायी नेतृत्व व वीरतेचे दर्शन घडविल्याबद्दल साजिद सय्यद यांना सेना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. राजापूर येथील जवानाच्या बहादुरीची बातमी सोशल मीडियावरून व्हायरल होताच त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

टॅग्स :GovernmentसरकारSocialसामाजिक