लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ग्रामविकास विभागाने सन २०१८-१९ मध्ये घेतलेल्या पंचायतराज पुरस्कार स्पर्धेत विभागात अव्वल ठरलेल्या नाशिक जिल्हा परिषदेला गुरुवारी मुंबई येथे प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी कळवण व इगतपुरी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांनाही पुरस्काराने गौरविण्यात आले.राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी हा पुरस्कार स्वीकारला.जिल्हा परिषदेला प्राप्त होणाºया तक्रारी, निवेदने, बैठकांचे इतिवृत्त, शासन दरबारी केला जाणारा पत्रव्यवहार, कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकांची नोंद, फाइलींचा निपटारा, योजनांची अंमलबजावणी आदी प्रशासकीय कामकाजाची पंचायत राज व्यवस्थेत पाहणी केली जाते. शासनाने सन २०१८-१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या दप्तराची तपासणी केली होती. यामध्ये नाशिक विभागातून नाशिक जिल्हा परिषदेला प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला. विभाग स्तरावर नाशिक विभागात नाशिक जिल्ह्णातील कळवण पंचायत समितीला व्दितीय तर इगतपुरी पंचायत समितीला तृतीय क्रमांक मिळाला. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे कनिष्ठ सहायक मंगेश केदारे व निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक शीतल सनेर यांनाही गुणवंत पुरस्काराने गौरविण्यात आले. पंचायतराज संस्थांना त्यांनी केलेल्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता अधिक वाढविणे व त्यांच्यामध्ये उत्कृष्ट कामाची स्पर्धा निर्माण करण्यासाठी सदरचे पुरस्कार देण्यात येतात.
जिल्हा परिषदेला पंचायतराज पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 23:49 IST
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : ग्रामविकास विभागाने सन २०१८-१९ मध्ये घेतलेल्या पंचायतराज पुरस्कार स्पर्धेत विभागात अव्वल ठरलेल्या नाशिक जिल्हा ...
जिल्हा परिषदेला पंचायतराज पुरस्कार प्रदान
ठळक मुद्देविभागात अव्वल : कळवण व इगतपुरीचा गौरव