शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनकर्त्यांची पदे धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:38 IST

राजकीय आंदोलने करणाºया कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीच झाला, मात्र त्याबाबत पोलीस आयुक्तांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्याने याबाबत कार्यवाहीच झाली नसल्याचे वृत्त आहे. परिणामी सत्तारूढ सेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांनाच याचा फटका बसला असून, गुन्हे दाखल करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना अगदी विशेष कार्य अधिकाºयापासून अन्य अनेक समित्यांपासून वंचित राहावे लागले आहे.

संजय पाठक ।नाशिक : राजकीय आंदोलने करणाºया कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीच झाला, मात्र त्याबाबत पोलीस आयुक्तांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्याने याबाबत कार्यवाहीच झाली नसल्याचे वृत्त आहे. परिणामी सत्तारूढ सेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांनाच याचा फटका बसला असून, गुन्हे दाखल करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना अगदी विशेष कार्य अधिकाºयापासून अन्य अनेक समित्यांपासून वंचित राहावे लागले आहे.सामान्यत: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राजकीय कार्यकर्त्यांवरील दाखल गुन्हे मागे घेण्यासंदर्भात शासन निर्णय होत असतो. राज्यात १९९५ मध्ये सर्व प्रथम सत्तांतर झाल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी अशाप्रकारचा निर्णय घेतला होता. राज्यात सर्वाधिक काळ विरोधात राहून संघर्ष केल्याने विविध राजकीय आंदोलनांचे गुन्हे सेना-भाजपाच्याच कार्यकर्त्यांवर दाखल होते. आताही तीच परिस्थती आहे. त्यामुळे भाजपा-सेनेची सत्ता आल्यानंतर गृहमंत्रालयाने अशाच प्रकारचा निर्णय घेतला. त्यानुसार ज्या आंदोलनात जीवित हानी झालेली नाही तसेच पाच लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, अशा गुन्ह्यांमधील कार्यकर्त्यांवरील दोष काढला जाऊ शकतो. १३ जानेवारी २०१५ मध्ये यासंदर्भात गृहखात्याने निर्णय घेताना पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली. त्यात पोलीस उपआयुक्त (गुन्हे) हे सदस्य सचिव असतील तर सहायक संचालक, अभियोग संचालनालय हे सदस्य असतील अशी शहरी भागात तर ग्रामीण भागात जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील समितीत अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हे सदस्य सचिव तसेच अभियोग संचलनालयाचे सहायक संचालक हे सदस्य अशी समिती गठीत केली आहे. तथापि, गेल्या दोन वर्षांत नाशिकमध्ये यासंदर्भात कार्यवाहीच झालेली नाही. त्याचा फटका सेना-भाजपाच्याच कार्यकर्त्यांना बसला आहे.