शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ध्वनिप्रदूषण प्रतिबंधक कारवाईस टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:44 IST

सोयगाव भागातील जयराम नगर, शांतिनगर, सप्तशृंगी पार्क या भागात असलेल्या सूर्यवंशी लॉन्स व मंगल कार्यालय परिसरात लग्नसोहळ्यात वाजणारे डीजे व कर्णकर्कश वाद्य यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार कायदेशीर कारवाई करण्यास कॅम्प विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे व पोलीस प्रशासनाने टाळाटाळ केली आहे. यामुळे नागरिकांनी थेट अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची भेट घेऊन तक्रार करीत कारवाईची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

मालेगाव : सोयगाव भागातील जयराम नगर, शांतिनगर, सप्तशृंगी पार्क या भागात असलेल्या सूर्यवंशी लॉन्स व मंगल कार्यालय परिसरात लग्नसोहळ्यात वाजणारे डीजे व कर्णकर्कश वाद्य यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार कायदेशीर कारवाई करण्यास कॅम्प विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे व पोलीस प्रशासनाने टाळाटाळ केली आहे. यामुळे नागरिकांनी थेट अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची भेट घेऊन तक्रार करीत कारवाईची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.  सोयगाव परिसरातील नागरी वसाहतीत सूर्यवंशी लॉन्स व मंगल कार्यालय आहेत. ध्वनिप्रदूषण व वाहतूक समस्या यामुळे येथील रहिवाशांना त्रास होतो. शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात अडचणी येतात. डीजेच्या आवाजामुळे इमारतीचे दरवाजे, खिडक्या, तावदाने यांना हादरे बसतात. डीजेचा आवाज इतका प्रचंड असतो की जोपर्यंत डीजे वाजत असतो, तोपर्यंत घरातील लोकांना परस्परांचे बोलणे ऐकू येत नाही. या आवाजाचा वृद्धांच्या हृदयाला त्रास होतो. प्रचंड प्रमाणातील ध्वनिप्रदूषणामुळे येथे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. परिणामी डीजे मालक, लग्नाला येणारी वºहाडी मंडळी व स्थानिक रहिवासी यांच्यात वाद वाढले आहेत.  याविषयी रहिवाशांच्या शिष्टमंडळाने दि. १९ एप्रिल रोजी कॅम्प पोलीस उपअधीक्षक हगवणे यांना निवेदन देऊन सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनिप्रदूषण संदर्भात दिलेल्या निकालानुसार कारवाई करण्याची मागणी केली होती. यावेळी हगवणे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. परंतु नंतर प्रत्यक्ष वाद्य व डीजेवर कारवाई होण्याऐवजी परिसरात जाणीवपूर्वक दीर्घकाळ वाद्य वाजवले जात असल्याचे नागरिकांच्या अनुभवास आले.  रहिवासी नागरिकांनी पुन्हा दि.२ मे रोजी हगवणे यांची भेट घेतली. त्यांनी कॅम्प पोलीस निरीक्षकांना कारवाईच्या सूचना केल्या, परंतु कारवाई झाली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करण्यास पोलिसांकडून होणारी टाळाटाळ संशयास्पद ठरली आहे.  २ हजार लोकसंख्येच्या नागरिकांची मागणी दखल  घेतली गेली नसल्याने संतप्त रहिवाशांनी थेट अपर पोलीस अधीक्षक पोद्दार यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे. या शिष्टमंडळात दिनेश ठाकरे, प्रशांत बच्छाव, माणिक कदम, राजेंद्र निकम, रोशन देवरे, गोरख शेवाळे, विलास वानखेडे, एन.ए. पाटील आदींचा समावेश होता.

टॅग्स :Policeपोलिस