इगतपुरी : तालुक्यात ग्रामिण भागात दलीत वस्ती सुधार योजना आंतर्गत १५ टक्के निधीचा वापर करण्यास ग्रामसेवक व गटविकास अधिकारी जाणिव पुर्वक टाळाटाळ करतात हि बाब आनेकदा लक्षात आल्याने नांदगाव सदो गणातील पंयायत समितीच्या सदस्य तथा माजी उपसभापती सविता जगताप यांनी पंचायत समितीच्या प्रशासन व ग्रांमसेवक यांच्या कडे रितसर माहिती मागीतली मात्र संबाधित अधिकारी व् कर्मचा्ऱ्यांनी माहिती देण्यास टाळा टाळ करून उडवा उडवीचि उत्तरे दिली . पुन्हा एकदा या बाबत स्मरण पत्राची गरज आसल्याचे जाणुन या वेळी इतर पंचायत समिती सदस्य व उपसभापति च्यां उपस्थीतीत गटविकास अधिकारी किरण कोवे यांना स्मरण पत्र देण्यात आले .दलीत वस्ती सुधार योजने च्या कामांत मोठया फ्रमाणात भ्रष्टाचार जर लक्ष्यात आला तर लोकशाही पध्दतीने अंदोलन केले जाईल असे हि या निवेदनात म्हटले आहे .निवेदन देतांना पंचायत समिति उपसभापती पांडुरंग वांरूगसे , वैशाली सहाणे ,ठकूबाई सावंत ,सविता जगताप आदि उपस्थीत होते . (वार्ताहर)
दलीत वस्तीत निधीचा वापर करण्यास टाळाटाळ
By admin | Updated: October 6, 2015 00:03 IST