शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी, कातकरी लोकांनाशिधापत्रिका देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 19:00 IST

घोटी : शिधापत्रिका मिळत नसल्याने आदिवासी, कातकरीसह वाड्या-पाड्यातील वस्त्यावर राहणाऱ्या गरीब लाभार्थी कुटुंबांची रेशन धान्याअभावी उपवासमार होत असुन त्यांना शिधापत्रिका देण्यास तहसिल कार्यालयातुन टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेर्धात मंगळवारी (दि.२९) श्रमजीवी संघटनेच्या वतीने ठिय्या अंदोलन सुरु करण्यात आले.

ठळक मुद्देघोटी : श्रमजीवी संघटनेचे तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

घोटी : शिधापत्रिका मिळत नसल्याने आदिवासी, कातकरीसह वाड्या-पाड्यातील वस्त्यावर राहणाऱ्या गरीब लाभार्थी कुटुंबांची रेशन धान्याअभावी उपवासमार होत असुन त्यांना शिधापत्रिका देण्यास तहसिल कार्यालयातुन टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेर्धात मंगळवारी (दि.२९) श्रमजीवी संघटनेच्या वतीने ठिय्या अंदोलन सुरु करण्यात आले.कोरोना संसर्ग काळापासुन अद्यापपर्यंत शासनाने आदिवासी समाजाला केवळ खोटी आश्वासने देवून दिशाभुल करीत बोळवण केली आहे. रानमेवा व रानभाज्या खावुन आदिवासींनी कसे तरी दिवस काढले. मात्र अद्याप लाभार्थीना शिद्यापत्रिका मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आल्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला असुन जो पर्यंत शिधापत्रिका मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील असे संघटनेच्या वतीने तहसिलदार परमेश्वर कासुळे यांना कळविण्यात आले.यापुर्वी सुमारे पाच हजार शिधापत्रिकाचे अर्ज दाखल केले. त्या पैकी दिड हजार लाभार्थीना शिधापत्रिका दिल्या. विभक्त, जिर्ण व नवीन कार्ड धारकांना अद्याप शिधापत्रिका मिळाल्या नाहीत. मंगळवारी आंदोलनाच्या दिवशी सुमारे दिड हजार लाभार्थीनीं नव्याने अर्ज दाखल केले असुन मागील लाभार्थीना शिधापत्रिका कधी मिळेल हा मोठा प्रश्न आहे.आदिवासींकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत शासन झोपेचे सोंग घेत असल्याने शासनाविरूद्ध घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. जो पर्यंत शिधापत्रिका मिळणार नाही तो पर्यंत तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरूच राहील अशी माहिती संघटनेचे राज्य सचिव विजय जाधव यांनी दिली.यावेळी श्रमजीवी संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव विजय जाधव, जिल्हा अध्यक्ष शाम लोंढे, ठाणे विभाग जिल्हा अध्यक्ष दशरथ भालके, तालुका सचिव सुनिल वाघ, तालुका अध्यक्ष संजय शिंदे, जिल्हा महिला अध्यक्ष निता गावंडा, तालुका सचिव शांताराम भगत, जिल्हा कातकरी समाज अध्यक्ष सुनिल वाघ, तालुका अध्यक्ष काळु निर्गुडे आदिसह शेकडो कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते.ज्या लाभार्थीचे शिधापत्रिकेसाठी अर्ज प्राप्त आहेत, त्यापैकी ज्यांच्या पेपरची पुर्तता आहे, त्यांना कार्ड वितरीत केली जात आहेत. काही लाभार्थीचे पेपर अपुर्ण व कागदोपत्रात तृटी आहे त्यांना तसे कळविले आहे. या आंदोलकांपैकी सुमारे दिड हजार कार्ड वितरीत केले जातील. व काहींना टप्याटप्याने दिले जातील. यात कोणीही शिधेपत्रिकेपासुन व शासनाच्या धान्य वितरणापासुन वंचित रहाणार नाही.- परमेश्वर कासुळे, तहसिलदार. 

टॅग्स :StrikeसंपGovernmentसरकार