शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

बाधित रूग्ण सापडल्याने शिक्षण विभागाला टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 17:36 IST

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचारी कोरोना बाधित आढळल्याने बुधवारी सकाळीच शिक्षण विभागाला टाळे ठोकण्यात आले असून, प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत नुतन प्रशासकीय इमारतीवर प्रवेश बंदी लादली आहे.

ठळक मुद्देगंभीर दखल नुतन प्रशासकीय इमारतीवर प्रवेश बंदी

नाशिक : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचारी कोरोना बाधित आढळल्याने बुधवारी सकाळीच शिक्षण विभागाला टाळे ठोकण्यात आले असून, प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत नुतन प्रशासकीय इमारतीवर प्रवेश बंदी लादली आहे.जिल्हा परिषदेने आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनापासून बचावासाठी विविध उपाययोजना केल्या असून, शासकीय कामकाजानिमित्त येणा-या अभ्यागतांचीही तपासणी करून कार्यालयात सोडले जात आहे. असे असताना माध्यमिक शिक्षण विभागातील एक कर्मचारी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्रास होत असतानाही कार्यालयात कामकाज करीत होता. बुधवारी सकाळी त्याला अधिक त्रास होवू लागल्याने त्याला उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले, त्याच दरम्यान त्याचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. तातडीने त्याची दखल घेत माध्यमिक शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोरंटाईन होण्याच्या सुचना देण्यात आल्या. गेल्या महिन्यात अशाच प्रकारे ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील एक कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे आढळून आल्याने सदरचा विभाग पुर्ण बंद करण्यात आला होता व त्यानंतरच प्रशासनाने अभ्यागतांवर निर्बंध लादण्याबरोबरच खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत माध्यमिक शिक्षण विभागाबरोबरच, लघु पाटबंधारे, एकात्मीक बाल विकास प्रकल्प व ग्रामीण पाणी पुरवठा असे विभाग असून, या इमारतीत कोरोना बाधित रूग्ण सापडल्याने सर्व विभागातील कर्मचारी धास्तावले आहेत. 

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण